इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 30 डिसेंबर रोजी डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 प्रदान करणार
Posted On:
29 DEC 2020 7:35PM by PIB Mumbai
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल इंडिया पुरस्कार 2020 प्रदान करतील. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने प्रथमच डिजिटल इंडिया पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया नामांकनांपासून ते अंतिम पुरस्कार सोहळ्यापर्यंत ऑनलाईन होत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) ई गव्हर्नन्समध्ये नवसंशोधन आणि सरकारी सेवा वितरण यंत्रणेच्या डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी द्वैवार्षिक डिजिटल इंडिया पुरस्कार (डीआयए) आयोजित करत आहे.
केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सहानी आणि इतर मान्यवर प्लेनरी हॉल , विज्ञान भवन, नवी दिल्ली आणि कोलकाता, भोपाळ आणि चेन्नईसह विविध ठिकाणांहून आभासी स्वरूपात कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
हा कार्यक्रम 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम दूरदर्शनवर थेट प्रसारित केला जाईल आणि एनआयसी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील थेट प्रक्षेपित होईल:
एनआयसी वेबकास्ट- http://webcast.gov.in/digitalindiaawards
यूट्यूब- https://www.youtube.com/nationalinformaticscentre
ट्विटर- https://twitter.com/NICMeity
फेसबुक- https://www.facebook.com/NICIndia
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1684463)
Visitor Counter : 241