अणुऊर्जा विभाग

मुंबईच्या  भाभा अणु संशोधन केंद्राने (बीएआरसी), डोळ्याच्या ट्यूमरच्या उपचारांसाठी पहिल्या  देशी रुथेनियम 106 प्लाकच्या रूपात नेत्र कर्करोग थेरपी विकसित केली

Posted On: 29 DEC 2020 7:21PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ईशान्य प्रदेश, पंतप्रधान कार्यालयकार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी डोळ्याच्या ट्यूमरच्या उपचारांसाठी पहिल्या  देशी रुथेनियम 106 प्लेकच्या रूपात नेत्र कर्करोग थेरपी विकसित केल्याबद्दल भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) मुंबईचे कौतुक केले. सर्जनसाठी प्लाक हाताळणे खूप सोयीचे आहे आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अणु ऊर्जा विभागाचे  (डीएई)  अध्यक्ष सहसचिव डॉ. के एन व्यास यांनी अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी अणु ऊर्जा विभागाद्वारे  डोळ्यांशी संबंधित पॅचेस  विकसित करण्याच्या व्यवहार्यतेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर, डी. जितेंद्र सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर, अणु उर्जा विभागाने डॉ. राजेंद्र प्रसाद नेत्र विज्ञान केंद्र, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था  (एम्स), नवी दिल्ली यांच्याबरोबर  सहकार्य केले. नंतर, एम्स, नवी दिल्ली ने  डोळ्यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणु संशोधन केंद्राने (बीएआरसी) विकसित केलेल्या प्लाकचा वापर करण्यास सहमती दर्शविली आणि सप्टेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा कोरॉईडल  हेमॅन्गओमा  असलेल्या रूग्णाच्या उपचारासाठी वापरला गेला. आणि तो समाधानकारक असल्याचे सिद्ध झाले.

एम्स नवी दिल्लीच्या  डॉ. राजेंद्र प्रसाद नेत्र विज्ञान केंद्रचे प्रमुख प्राध्यापक डॉ. अतुल कुमार यांच्या मते, आतापर्यंत अणुऊर्जा विभागामार्फत भारतात तयार केलेल्या बीएआरसी प्लाकचा  उपयोग डोळ्यांचा कर्करोग असलेल्या सात रुग्णांसाठी  केला गेला आहे. यापैकी  दोघांना रेटिनोब्लास्टोमा, दोन कोरॉईडल  मेलानोमा, दोघांना ओक्युलर सर्फेस स्क्वामस नियोप्लासिया (ओएसएसएन) आणि एकाला कोरॉईडल  हेमॅन्गिओमा होता. प्लेकची हाताळणी  सर्जन-अनुकूल असून प्राथमिक परिणाम अत्यंत समाधानकारक आहेत,

या प्रगतीबद्दल डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, गेल्या पाच वर्षांत किंवा अणू उर्जा विभागाने सामान्य नागरिकांच्या हितासाठी आपल्या कामांमध्ये आणि अनुप्रयोगांना आणखी विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, नेत्र कर्करोगाच्या रुग्णांसाठी स्वदेशी  प्लाक ब्रॅचिथेरपी विकसित करणे देखील वैद्यकीय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात हा एक नवीन उपक्रम आहे. या उपचार पद्धतीमुळे रूग्णांना एक सोपा व किफायतशीर पर्याय उपलब्ध झाला आहे, असे ते म्हणाले.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684460) Visitor Counter : 430