उपराष्ट्रपती कार्यालय
विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट लोकांचे जीवन आरामदायी आणि आनंदी बनवणे हे आहे : उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतींनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्सच्या सीआरईएसटी संकुलाला भेट दिली आणि दोन नवीन अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन केले
Posted On:
29 DEC 2020 6:47PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले की, विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट लोकांचे जीवन आरामदायी आणि आनंदी बनवणे आहे. त्यांनी वैज्ञानिक संस्थांना नवसंशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले.
बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्रातील संशोधन व शिक्षण केंद्रात (सीआरईएसटी) विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित करताना ते म्हणाले की विज्ञान कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, कारण ते वारंवार प्रयोगाच्या माध्यमातून तथ्ये सत्यापित करण्याशी संबंधित आहे.
सीआरईएसटी संकुलाच्या भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी एम.जी.के. मेनन अंतरिक्ष विज्ञान प्रयोगशाळेचा भाग म्हणून, तीस मीटर टेलीस्कोपसाठी मिररसाठी मोठ्या सेगमेंट पॉलिशिंग सुविधा आणि छोट्या पेलोडची पर्यावरणीय चाचणी सुविधा या दोन नवीन सुविधांचे उद्घाटन केले.
एम.जी.के. मेनन अंतरिक्ष विज्ञान प्रयोगशाळेमधील स्पेस पेलोडचे एकत्रीकरण आणि 2 मीटर हिमालयीन चंद्र टेलीस्कोपचे रिमोट ऑपरेशन त्यांनी पाहिले.
मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की खगोलशास्त्र आणि गणितामध्ये प्राचीन काळापासून भारताला समृद्ध वारसा आहे. आज उद्घाटन झालेल्या सुविधांमुळे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानात भारताला मदत होईल.
पर्यावरणीय चाचणी सुविधा येत्या काही वर्षांत अवकाश क्षेत्राला मदत करेल.
हे लक्षात घेतले जावे की उत्तर गोलार्धात जमिनीवरील सर्वात मोठा खगोलीय प्रकल्प उभारण्यासाठी आणि त्याचे परिचालन करण्यासाठी भारत, जपान, चीन, कॅनडा, यूएसए, भारत या पाच देशांतील संशोधन संघटना आणि विज्ञान संस्थांच्या आंतरराष्ट्रीय समूहात भारत सामील झाला आहे. हवाई येथील मौना कीच्या शिखरावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित बहु-अब्ज अमेरिकी डॉलर प्रकल्पात भारत 10% भागीदार आहे. 2030 च्या दशकाच्या सुरूवातीला प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
टेलिस्कोप अत्यंत अचूकतेने आकाशाचा मागोवा घेत असताना, 30 -मीटर व्यासाचा एकच आरसा म्हणून काम करण्यासाठी सर्व 492 विभागांना तयार करण्याचा यात समावेश आहे. 492 विभाग नियंत्रित करण्यासाठी सॉफ्टवेयर, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरशी संबंधित भारताचे योगदान काही नॅनोमीटरमध्ये एकच आरसा म्हणून काम करेल. डझनहून अधिक उद्योग ही अतिशय सुस्पष्ट यंत्रणा बनविण्यात गुंतले आहेत.
नायडू यांनी नमूद केले की कोविड -19 महामारी रोखण्यात अनेक विकसित देशांपेक्षा भारताने अधिक चांगली कामगिरी बजावली आहे.
संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा.
S.Tupe/S.Kane/P.Kor
(Release ID: 1684433)
Visitor Counter : 261