उपराष्ट्रपती कार्यालय

कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांमधून संधी निर्माण करण्याचे उपराष्ट्रपतींचे युवकांना आवाहन


विजयवाड्याच्या स्वर्ण भारत न्यासाच्या प्रशिक्षणार्थींना उपराष्ट्रपतींकडून प्रमाणपत्रांचे वितरण

Posted On: 28 DEC 2020 9:41PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज कोविडमुळे निर्माण झालेल्या आव्हानांमधून संधी निर्माण करण्याचे युवकांना आवाहन केले. या महामारीच्या काळामध्ये तयार झालेल्या गरजा आणि आवश्यकता ओळखून त्याचा लाभ उठवावा, असे नायडू यावेळी म्हणाले.

विजयवाड्याच्या स्वर्ण भारत न्यासाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण केले.संस्थेच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते.  कोविड महामारीचा अनेक क्षेत्रावर परिणाम झाला आहे, त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत, त्याचा लाभ युवकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्वर्ण भारत न्यासाने युवक आणि महिलांना सक्षम बनविण्यासाठी आयोजित केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाचे उपराष्ट्रपती यांनी यावेळी कौतुक केले. त्याच बरोबर टाळेबंदीच्या काळात गरजू लोकांना न्यासाच्यावतीने करण्यात आलेल्या मदतीची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी आणि स्वर्ण भारत न्यासाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1684244) Visitor Counter : 184