आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात सक्रीय रुग्ण संख्येत होणारी घट कायम, सक्रीय रुग्ण संख्या आज 2.77 लाख


बरे झालेल्यांची एकूण संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा 95 लाखाहून अधिक

दहा लाख लोकसंख्येमागे रुग्णांची संख्या आणि मृत्यू कमी असलेल्या जगातल्या देशांमध्ये भारताचे स्थान

Posted On: 28 DEC 2020 12:46PM by PIB Mumbai

 

भारतात एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याचा कल कायम आहे. देशात आज 2,77,301 सक्रीय रुग्णांची नोंद झाली. एकूण पॉझीटीव्ह रुग्णात, सक्रीय रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन  ते 2.72%.झाले आहे.

गेल्या 24 तासात एकूण सक्रीय रुग्णात 1,389 ची घट झाली.

महिन्यापेक्षा जास्त काळापासून, दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासात, देशात  20,021 जण पॉझिटीव्ह आढळले तर  याच काळात 21,131 जण कोरोतून बरे झाले. यामुळे सक्रीय रुग्ण संख्येत घट कायम राहिली.

एकूण बरे झालेल्यांची संख्या सुमारे 98 लाख  (97,82,669) झाली असून बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो 95.83%. झाला आहे. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर सातत्याने  वाढत असून  आज ते 95  लाखाहून अधिक (95,05,368) झाले आहे.

जगाशी तुलना करता भारतात दहा लाख लोकसंख्ये मागची रुग्ण संख्या जगातल्या सर्वात कमी संख्येपैकी (7,397) आहे. जागतिक सरासरी 10,149 आहे. रशिया, ब्रिटन,इटली, ब्राझील,फ्रान्स आणि अमेरिका यासारख्या देशात दहा लाख लोकसंख्ये मागची रुग्ण संख्या बरीच जास्त आहे. 

बरे झालेल्यांपैकी 72.99% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये  एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 3,463 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून  गेल्या 24 तासात महाराष्ट्रामध्ये 2,124 आणि पश्चिम बंगाल मध्ये 1,740  जण बरे झाले.

नव्या रुग्णांपैकी  79.61%  रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 4,905 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 3,314 आणि पश्चिम बंगाल 1,435 मध्ये रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 279 मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 80.29% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात  सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 66  मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 29  आणि केरळ मध्ये 25  मृत्यूंची नोंद झाली.

भारतात दैनंदिन मृत्यू संख्येत घट होत आहे. दहा लाख लोकसंख्येमागे 107 जणांचा मृत्यू हा भारतातला आकडा जगातल्या सर्वात कमी आकड्यापैकी एक आहे. जागतिक सरासरी 224 आहे.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684083) Visitor Counter : 161