उपराष्ट्रपती कार्यालय

स्वदेशी लशीसंदर्भातील परिस्थितीवर उपराष्ट्रपतींची चर्चा


भारत बायोटेकच्या अध्यक्षांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

उपराष्ट्रपतींनी जागतिक दर्जाच्या उत्पादनाच्या दृष्टीने  सार्वजनिक- खासगी भागीदारीच्या महत्वावर भर दिला

Posted On: 25 DEC 2020 4:19PM by PIB Mumbai

 

भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्णा एला आणि सह व्यवस्थापक सुचित्रा एला यांनी आज हैदराबाद येथे उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांची थेट घेतली.

स्वदेशी लशीसंदर्भातील विद्यमान परिस्थिती आणि भारताबरोबरच जगभरात ती उपलब्ध करून देण्याची योजना यासंदर्भात चर्चा झाली.  भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (NIV) यांच्या सहकार्याने ही लस तयार केली आहे आणि सध्या निष्क्रिय अवस्थेत असलेली लस भारत बायोटेकच्या BSL-3 (Bio-Safety Level 3) बायो-कंटेट सुविधा यामध्ये तयार केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भारत बायोटेकला भेट देऊन COVAXIN लशीसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर विविध देशांच्या 70 राजदूतांनी तसेच उच्चायुक्तांनी जीनोम व्हॅली, हैदराबाद येथील भारत बायोटेक भेट दिली होती.

उपराष्ट्रपतींनी या भेटीत जागतिक दर्जाचे उत्पादन तयार करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक  खासगी भागीदारी चे महत्व अधोरेखित केले आणि आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्यामधील सहयोगाची प्रशंसा केली

****

S.Thakur/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683599) Visitor Counter : 209