अर्थ मंत्रालय

2021-22 च्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकांचे सत्र समाप्त


9 गटांचे प्रतिनिधित्व करणारे 170 पेक्षा जास्त निमंत्रित 15 आभासी बैठकांमध्ये सहभागी

Posted On: 23 DEC 2020 7:51PM by PIB Mumbai

 

2021-22 च्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 14 ते 23 डिसेंबर 2020 दरम्यान दूरदृश्य प्रणालीद्वारे अर्थसंकल्पपूर्व बैठका पार पडल्या.

या काळात घेण्यात आलेल्या 15 आभासी बैठकांमध्ये 9 संबंधित गटांचे प्रतिनिधित्व करणारे 170 पेक्षा जास्त निमंत्रित सहभागी झाले. वित्तीय आणि भांडवली बाजार. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास, जल आणि स्वच्छता, व्यापार संघटना आणि कामगार संघटना, उद्योग, सेवा आणि व्यापार, पायाभूत सुविधा, उर्जा आणि हवामान बदल, कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योग, उद्योगपती, अर्थशास्त्रातले तज्ज्ञ  यांचा समावेश होता.

केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर, वित्त सचिव डॉ ए बी पांडे, डिआयपीएम सचिव तुहीन कांता पांडे, व्यय सचिव टी व्ही सोमनाथन, डीईए सचिव तरुण बजाज, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम तसेच वित्त मंत्रालय आणि इतर मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले.

कर निर्धारणासह वित्तीय धोरण,रोखे बाजार, विमा, पायाभूत सुविधांवरचा खर्च, आरोग्य आणि शिक्षण तरतूद, सामाजिक संरक्षण, कौशल्य, वॉटर हार्वेस्टिंग आणि जल संवर्धन, स्वच्छता, मनरेगा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, उत्पादन आधारित गुंतवणूक योजना, निर्यात, मेड इन इंडिया उत्पादनांचे ब्रॅण्डींग, नवोन्मेश, प्रदूषण टाळणारे उर्जेचे स्त्रोत आणि वाहने यासह इतर विविध विषयांवर संबंधितांनी अनेक सूचना केल्या.

कोविड-19 चा आलेख उतरता राहण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची आणि  2020-21च्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मोठी चालना मिळाल्याबद्दल त्यांनी सरकारची प्रशंसा केली.

सहभागी झालेल्या तज्ज्ञांनी केलेल्या मौल्यवान सूचनांबद्दल वित्त मंत्र्यांनी त्यांचे आभार मानले, 2021-22 चा अर्थ संकल्प तयार करताना या सूचना काळजीपूर्वक विचारात घेतल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.

***

S.Thakur/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1683123) Visitor Counter : 193