अर्थ मंत्रालय
केर्न एनर्जी प्रा.लि. आणि केर्न युके होल्डिंग्स लिमिटेड यांच्यासंबंधीच्या मध्यस्थीतील निवाड्याचा अभ्यास सरकार करणार
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2020 3:42PM by PIB Mumbai
भारत- युनायटेड किंग्डम दरम्यानच्या 'गुंतवणूक प्रोत्साहन आणि संरक्षण करारांतर्गत', केर्न एनर्जी प्रा.लि. आणि केर्न युके होल्डिंग्स लिमिटेड यांनी भारत सरकारविरोधात दाद मागितल्या प्रकरणी निवाडा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सरकार या निवाड्याचा आणि त्याच्याशी संबंधित सर्व पैलूंचा सल्लागारांशी मसलत करून काळजीपूर्वक अभ्यास करणार आहे. या सल्ला-मसलतींनंतर सरकार सर्व पर्याय विचारात घेऊन पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेणार आहे. यात, उचित मंचांसमोर कायदेशीर तोडगा काढण्याचा पर्यायही समाविष्ट आहे.
****
M.Chopade/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1682947)
आगंतुक पटल : 209