रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कर्नाटक मधल्या सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या 33 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन
Posted On:
19 DEC 2020 7:11PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दूर दृश्य प्रणालीद्वारे कर्नाटक मधल्या 33 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले.या प्रकल्पांतर्गत 10,904 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 1,197 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात कर्नाटकात 900 किलोमीटरहून जास्त राष्ट्रीय महामार्गांचा समावेश झाला आहे आणि आता त्यांची एकूण लांबी 7652 किलोमीटर झाली आहे. एकूण 2,384 किलोमीटर लांबींच्या रस्त्यांची 37,311 कोटींच्या खर्चाचे 71 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी 1,127 किलोमीटर लांबीच्या 12,286 कोटी रुपये खर्चाच्या 26 प्रकल्पांमा मध्ये कामामध्ये 70% प्रगती झाली आहे, असे ते यावेळी म्हणाले.
व्यापार आणि अर्थव्यवस्थेला लाभ व्हावा यासाठी बंदरांच्या सुलभ कनेक्टीव्हिटीसाठी गोवा ते केरळ सीमेपर्यंत, बेलेकेरी, कारवार व मंगलोर या शहरांना जोडणाऱ्या 278 किमी लांबीच्या व 3443 कोटी रुपये खर्चाच्या संपूर्ण लांबलचक किनारी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या विचारातून राष्ट्रीय महामार्ग-75 यावरील डोंगर उतारावरील शिर्डी घाट, राष्ट्रीय महामार्ग 73 वरील चार्मदी घाट व राष्ट्रीय महामार्ग-275 यावरील संपाजे घाट या तीनही कामांना मंजूरी देण्यात आली आहे, असे मंत्र्यांनी नमूद केले.
केंद्र सरकार येत्या काही वर्षात कर्नाटक राज्यामध्ये सुमारे 1,16,144 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. आर्थिक वर्ष 2019-21 मध्ये 5083 कोटी रुपये खर्चाचे एकूण 275 किमी लांबीच्या 11 रस्ते प्रकल्प या राज्याला देण्यात आल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
देशातील मुख्य ऊस उत्पादक राज्यांपैकी एक मोठे उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकाने मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन हाती घ्यावे अशी सूचना त्यांनी केली. देशात साखर व तांदूळ यांचे जास्त उत्पादन होत असून सरकारकडे पुरेसा साठा आहे. अतिरिक्त साठा इथेनॉलमध्ये रुपांतरीत करता येईल, जे वाहनासाठीच्या इंधनाला पर्याय म्हणून वापरता येईल असे त्यांनी नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर तर पडेलच शिवाय इंधनाला स्वदेशी पर्याय निर्माण होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही के.सिंग म्हणाले, आज उद्घाटन होत असलेल्या प्रकल्पांमुळे कर्नाटक मधल्या प्रमुख शहराना उत्तम कनेक्टीव्हिटी प्राप्त होईल. आंतरराज्य पातळीवरील कनेक्टीवीटी वेगवान आणि सुलभ होईल. याचा शेती, मासेमारी व आरोग्यक्षेत्रावरपरिवर्तनात्मक प्रभाव पडेल असे त्यांनी सांगितले.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1682021)
Visitor Counter : 153