उपराष्ट्रपती कार्यालय

ईशान्य प्रदेशातील पर्यटनाची अपार क्षमता उपयोगात आणण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या ‘ओ मिझोरम’ या इंग्लिश कवितासंग्रहाचे उपराष्ट्रपतींकडून प्रकाशन

Posted On: 18 DEC 2020 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020


ईशान्य भागातल्या  राज्यांमधली पर्यटनाची अपार क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडु  यांनी केले असून या भागाशी हवाई मार्गे संपर्क सुधारण्याच्या आवश्यकतेवर  भर दिला आहे.

ईशान्येकडच्या भागात पर्यटनाच्या क्षमतांचा संपूर्ण उपयोग केला तर निसर्ग पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटन हे या भागाच्या विकासाचा कणा ठरू शकतात असे त्यांनी सांगितले.

या भागासाठी आणि पर्यटन पायाभूत सुविधा पुरवण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांचा उल्लेख करत या भागात हवाई मार्गे संपर्क सुधारण्यामुळे पर्यटकांच्या ओघावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होईल असे ते म्हणाले.

परदेश प्रवासाला जाणारे 26 दक्षलक्ष पर्यटक दरवर्षी भारतात असतात याकडे लक्ष वेधत, कोविड पश्चात परिस्थितीत हे पर्यटक स्थानिक भागांना भेटी देण्याला पसंती देतील. यातूनच पर्यटनाला चालना देण्यासाठी ईशान्येकडच्या राज्यांना मोठी संधी उपलब्ध होईल असे उपराष्ट्रपती म्हणाले.

या भागातल्या पर्यटनाच्या क्षमता पुरेपूर उपयोगात आणण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारांना करत ईशान्येकडच्या पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्याच्या शक्यतांवर विचार करण्याची सूचना त्यांनी केली.

मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या ‘ओ मिझोरम’ पुस्तकाचे दूर दृश्य प्रणाली द्वारे प्रकाशन करताना या भागाच्या नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा करताना मिझोरमचे विविध रंगी उत्सव, लोकसंगीत, ताल धरायला लावणारे नृत्य यामुळे मिझो समाज खऱ्या अर्थाने आगळा असल्याचे ते म्हणाले. पूर्वेकडचा गानपक्षी म्हणून वर्णन करण्यात येणाऱ्या मिझोना संगीताची  नैसर्गिक प्रतिभा लाभली  आहे.

मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.


* * *

S.Thakur/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1681828) Visitor Counter : 261