उपराष्ट्रपती कार्यालय
माध्यमे अडचणीत, विघातक आव्हाने आणि अनिश्चित भविष्य यावर मात करण्यासाठी स्व-सुधारणा आवश्यक : उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडु
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2020 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2020
तांत्रिक विघातक प्रगतीसमोर माध्यमे आणि पत्रकारिता यांचे भविष्य आणि वृत्तांचे शुचित्व याबाबत चिंता व्यक्त करतानाच उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडु यांनी विश्वासार्ह पत्रकारिता सुनिश्चित करण्याचे आवाहन संबंधीताना केले आहे. माध्यमे हे लोकांच्या सबलीकरणाचे प्रभावी साधन असल्याचेही ते म्हणाले. पत्रकारिता : भूतकाळ,वर्तमान आणि भविष्य यावर दूर दृश्य प्रणालीद्वारे एम व्ही कामत स्मृती व्याख्यान देताना ते बोलत होते.
वृतपत्र स्वातंत्र्य, सेन्सॉरशिप, वृत्तांकनाच्या निकषांचे उल्लंघन, पत्रकारितेच्या मुल्यांची घसरण, पीत पत्रकारिता, लाभकारी पत्रकारिता, बनावट आणि पेड न्यूजद्वारे अपप्रचार आणि खोटी माहिती, इंटरनेटमुळे निर्माण झालेला अडथळा यासारख्या बाबींवर त्यांनी चिंता व्यक्त करत या बाबी आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या भविष्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
लक्षवेधी मथळ्याचा आधार घेऊन तथ्याबाबत संशयाचे ढग निर्माण करत पीत पत्रकारिता चुकीच्या माहितीला प्रोत्साहन देते, असे ते म्हणाले.
इंटरनेटचा उदय आणि सोशल मिडीयाचा विस्तार यामुळे बनावट वृत्ताच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या वाढत्या झटपट पत्रकारितेबाबत आणि पत्रकारितेच्या मुल्यांच्या होणाऱ्या ऱ्हासाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञान मोठ्या माहितीचे द्वार म्हणून तर वृत्त वितरक म्हणून वेब पुढे येत असल्याचे ते म्हणाले.
वृत्तपत्रासारख्या पारंपरिक माध्यमांच्या वित्तीय जटिलतेबाबत चर्चा करताना तंत्रज्ञान कंपन्या पत्रकारिता उत्पादनाचा लाभ घेत आहेत मात्र त्यांना महसूलात सहभागी करत नसल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेटने महसूल आणि वार्तांकन आदर्शांवर विपरीत परिणाम केला आहे असे सांगून याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असे ते म्हणाले.
विकासात्मक प्रयत्नांवर, भागीदारी आणि लोक सहभाग आणि संबंधितांचा सहभाग, आव्हाने आणि त्यावर केलेली मात याकडे पुरेसे लक्ष देण्याचे आवाहन नायडू यांनी केले.
* * *
S.Thakur/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1681782)
आगंतुक पटल : 276