रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या कर्नाटक येथे 11,000 कोटी रुपयांच्या 33 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
Posted On:
18 DEC 2020 5:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या कर्नाटक इथे 33 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा या आभासी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवतील. तसेच, केंद्रीय मंत्री व्ही के सिंग, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होतील.
या सर्व प्रकल्पांअंतर्गत सुमारे 1200 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम केले जाणार आहे. काही प्रकल्पांचे उद्घाटन तर काही प्रकल्पांचे भूमिपूजन होणार असून, या संपूर्ण प्रकल्पांसाठी 11,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमुळे कर्नाटकातील रस्ते वाहतूक उत्तम होणार असून त्यातून कर्नाटकच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
* * *
S.Thakur/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1681739)
Visitor Counter : 224