गृह मंत्रालय

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह


आज, मोदी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली

पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार

अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले

Posted On: 16 DEC 2020 9:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मोदी सरकार सातत्याने देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले, मोदी सरकारने आणखी एक महत्वपूर्ण  निर्णय घेतला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 3,500 कोटी रुपयांचे सहाय्य जाहीर केले.

अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले. या निर्णयाचा पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि या क्षेत्राशी संबंधित पाच लाख कामगारांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 

अमित शाह पुढे म्हणाले, ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट जमा करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारासंबंधीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपयांची मदत करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. 

सध्या देशात पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेले लोक आहेत. याव्यतिरिक्त, पाच लाख कामगार साखर कारखान्यांमध्ये आणि पूरक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची उपजिविका साखर उद्योगावर आधारीत आहे

किसानों के हितों के प्रति समर्पित @narendramodi सरकार ने आज एक और बडा निर्णय लेते हुए गन्ना किसानों के लिए ₹3500 करोड़ की सहायता को मंजूरी दी।

यह राशि सीधे किसानों के खातों में जमा होगी।
इस निर्णय से पांच करोड़ गन्ना किसान व पांच लाख कामगार लाभान्वित होंगे।#GovtWithGannaKisan pic.twitter.com/RdYsKfWTPJ

— Amit Shah (@AmitShah) December 16, 2020

***

G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor


(Release ID: 1681278) Visitor Counter : 174