उपराष्ट्रपती कार्यालय

जागतिक आवाका विस्तारित करण्यासाठी भारताने सॉफ्ट पॉवरचा वापर करावा-उपराष्ट्रपती


संगीत आणि नृत्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची उपराष्ट्रपतींची इच्छा

Posted On: 15 DEC 2020 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2020


उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज कलाकारांना जागतिक आवाका विस्तारित करण्यासाठी सॉफ्ट पॉवरचा वापर करण्याचे आवाहन केले. आभासी माध्यमामधील संधींचा पुरेपूर वापर करून कलाकारांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे अशी विनंती त्यांनी कलाकारांना केली.

हैदराबादहून आभासी माध्यमातून ‘यूअर्स ट्रूली मार्गझी’ उत्सवाचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपतींनी भारतातील संगीत आणि नृत्याच्या गौरवशाली परंपरेवर प्रकाश टाकला आणि सध्याच्या धकाधकीच्या काळात त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या महत्वावर जोर दिला. ‘यूअर्स ट्रूली मार्गझी’ हा उत्सव चेन्नई मध्ये डिसेंबर महिन्यात आयोजित केला जातो; संगीत आणि नृत्य महोत्सवाची ही प्रसिद्ध परंपरा ऑनलाइन माध्यमातून जिवंत ठेवण्याचा हा उपक्रम आहे.

यावेळी बोलताना उपराष्ट्रपतींनी जागतिक कल्पनेला आकार देताना सॉफ्ट पॉवरचे नम्र स्वरूप अधोरेखित केले. भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आमच्या नृत्य आणि संगीताद्वारे आम्ही जगभरात अहिंसा, शांतता आणि सुसंवाद यासारख्या आदर्शांचा प्रसार करू शकतो असे त्यांनी यावेळी नमूद केले. या प्रक्रियेत सरकारची मर्यादा लक्षात घेत  उपराष्ट्रपतींनी कलाकार, सहायक व आयोजकांना भारतीय संस्कृती, विचार व जीवनशैलीचे प्रदर्शन करण्याचे  आवाहन केले.

चेन्नईशी असलेला त्यांचा दीर्घकाळचा संबंध लक्षात घेता उपराष्ट्रपतींनी चेन्नईचे देशाची कर्नाटकी संगीताची राजधानी म्हणून कौतुक केले. नायडू यांनी चेन्नईचे आणखी एक वैशिष्ट्यही अधोरेखित केले....ते म्हणजे चैतन्यशील आधुनिक शहरासोबतच सांस्कृतिक आणि पारंपारिक वैशिष्ट्ये जपणारे शहर. 

नायडू म्हणाले की, महामारीच्या काळात कलाकारांना देखील त्रास सहन करावा लागला आणि ‘यूअर्स ट्रूली’ सारख्या नाविन्यपूर्ण आभासी उपक्रमामुळे त्यांना त्यांची कला जगभरातील प्रेक्षांसमोर सादर करण्याची संधी मिळू शकेल. भविष्यात, वास्तविक आणि आभासी माध्यमांचे अस्तित्व एकत्रित चालण्याची शक्यता आहे आणि कलाकारांनी आभासी माध्यमाची संभावत्यांचा पूर्णपणे वापर केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

लोकांची चिंता दूर करण्यासाठी नृत्य आणि संगीताचे महत्त्व लक्षात घेऊन उपराष्ट्रपतींनी विशेषतः कोविडच्या काळातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पुढे सांगितले की भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य आपल्या जीवनातील संतुलनाचे प्रतीक आहेत. आपल्या शास्त्रीय कलेमध्ये समग्रता, एकता आणि सुसंवाद या तत्त्वांचा एकत्रित संबंध आहे.

राष्ट्रपतींनी यावेळी सामवेद व नटराज यांची उदाहरणे उद्धृत करीत भारतातील प्राचीन संगीत आणि नृत्य परंपरेचा मागोवा घेतला. नटराजांच्या बाबतीत, नायडू म्हणाले की वैश्विक नर्तक म्हणून सुमारे एक हजार वर्षांहून अधिक काल शिवाचे रूप असून अद्याप त्याचे मूळ रूप शाश्वत आहे.

नृत्य, नाटक आणि संगीताचा खजिना ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आणि ते टिकवण्यासाठी व त्याचा प्रचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत यावर उपराष्ट्रपतींनी जोर दिला.

शास्त्रीय कला या आपल्या पुरातन शिक्षणाचा अविभाज्य भाग होत्या ही बाब अधोरेखित करून ही परंपरा मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवित करण्याची सूचना उपराष्ट्रपती नायडू यांनी केली. संगीत आणि नृत्य हे अभ्यासक्रमाचे अनिवार्य  भाग करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. या संदर्भात नवीन शिक्षण धोरण  प्रगतीशील पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680894) Visitor Counter : 122