वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठणे सुनिश्चित करण्यासाठी उद्योग आणि सरकारला भागीदारी करावी लागेल- आयसीसीच्या वार्षिक पूर्ण सत्रात पियुष गोयल

Posted On: 15 DEC 2020 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2020


वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष  गोयल यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक पूर्ण सत्राला संबोधित  केले.

आपल्या भाषणात पियुष  गोयल यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने कोविड -महामारीशी संबंधित हाल अपेष्टा कमी  करण्यासाठी, महामारीची व्यवस्थित हाताळणी करण्यात आणि देशाला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या मूळ उद्देशावर  परत आणण्यात बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केला.

गोयल म्हणाले की आपल्या व्यवसायांकडे, प्रक्रियेकडे  आणि आपल्या  कामाच्या पद्धतीकडे लक्ष देण्याची संधी म्हणून कोविडकडे आपण सर्वानी पाहिले पाहिजे. “या देशाला  तुमच्या सर्वांचा अभिमान आहे. भारतीय उद्योगाने पीपीई, मास्क  व व्हेंटिलेटर निर्मितीची  क्षमता ज्याप्रकारे विस्तारली ते हा  देश नेहमीच लक्षात ठेवेल”

‘आज जग भारताकडे विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहे. पियुष गोयल म्हणाले की, जगाला एक लवचिक जागतिक पुरवठा साखळी हवी आहे आणि ही संधी साधणे , "आत्मनिर्भर भारत’ हा आपला मंत्र, प्रेरणा व ध्येय बनवणे हे आपले कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे आज भारत जगाची औषधशाळा बनले आहे त्याप्रमाणे जगाचा कारखाना बनण्यासाठी आपण आपल्या कोट्यवधी कुशल तरूण मुला-मुलींचा उपयोग करायला हवा. 2025 पर्यंत आपण आपले 5 ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठू शकतो हे सुनिश्चित करण्यासाठी उद्योग आणि सरकारला भागीदारी करावी लागेल, "असे  गोयल पुढे म्हणाले.

गोयल यांनी उद्योजकांना विचारले की आपण 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करू तेव्हा आपण जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनण्याचा संकल्प करू  शकत नाही का?  लोककेंद्री धोरणे, सकारात्मक दृष्टीकोन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेली कार्यक्षम कृती, गरीबांसाठी अधिक चांगले जीवन आणि प्रामाणिक व्यवसाय पद्धतीला प्रोत्साहित करण्यासाठी, शाश्वत विकास सुनिश्चित करेल आणि आपल्याला परिवर्तनाकडे नेईल, असे गोयल म्हणाले.

गोयल पुढे म्हणाले की, 135 कोटी भारतीयांच्या गरजा भागवू शकू, चांगल्या प्रतीची आरोग्य सेवा, चांगले शिक्षण आणि चांगल्या   आयुष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण काम  करूया.
 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1680860) Visitor Counter : 111