पर्यटन मंत्रालय
“भारतातील पक्षीनिरीक्षण” या देखो अपना देश वेबिनारचे आयोजन
Posted On:
12 DEC 2020 11:09PM by PIB Mumbai
भारतातील पक्षी आणि पक्षी निरीक्षणातील संधी या विषयावर लक्ष केंद्रित करून पर्यटन मंत्रालयाने आज “भारतातील पक्षी” या शीर्षकाखाली देखो अपना देश वेबिनारचे आयोजन केले होते. भारताची जैवविविधता ही जगातील सर्वात श्रीमंत जैवविविधतांपैकी एक आहे. भारतात अगदी हिमालयापासून ते वाळवंट, किनारपट्टी, वर्षावन आणि उष्णकटिबंधीय बेटे सर्व भौगोलिक परिस्थिती आहे; भारत पृथ्वीवर आढळणाऱ्या जवळजवळ सर्व पारीस्थितिक -प्रांतांचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यात भारतीय निलपंख (इंडियन रोलर), धनेश (हॉर्नबिल्स), सारस क्रौंच, माळढोक (ग्रेट इंडियन बस्टार्ड), सुतार पक्षी (वुडपीकर्स), खंड्या (किंगफिशर्स) आणि इतर बर्याच प्रकारच्या 1300 हून अधिक जातीचे पक्षी आहेत.
निसर्गशास्त्रज्ञ, वन्यजीव छायाचित्रकार आणि अभ्यासात रस असलेले चित्रपटनिर्माता सौरभ सावंत यांनी वेबिनारमध्ये विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील लुप्त होत चाललेल्या प्राण्यांच्या विविध जातींचे सादरीकरण केले.
भारतीय संस्कृतीत पक्षी फार महत्वाची भूमिका बजावतात. पौराणिक कथांमध्ये, विविध पक्षी देवी-देवतांचे वाहन असल्याचा उल्लेख आढळतो. पक्षी युगानुयुगांपासून मनुष्याच्या अगदी जवळ आहेत आणि अश्म युगापासून ते आधुनिक युगापर्यंत मनुष्याच्या जीवनासाठी पक्षी नेहमीच प्रेरणादायक राहिले आहे. अश्म युगातील दगडावरील चित्रकला, गुहेमधील चित्रकल, मुगल चित्रकलेपासून ते आधुनिक काळातील चित्रकला, या सगळ्यामध्ये पक्षी अविभाज्य भाग आहे.
पक्षी आणि पक्षी निरीक्षण केवळ आपल्याला समजूतदार बनवत नाहीत तर आपल्याला निसर्ग आणि स्थानिक समुदायाजवळ देखील घेऊन जातात. पक्षी पर्यटन हा जगातील अब्जावधी डॉलरचा उद्योग आहे. पक्षी निरीक्षणाच्या मुख्य उद्देशाने दरवर्षी लाखो आंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन केले जाते आणि हिमालयापासून ते वाळवंटापर्यंत आणि अगदी पश्चिम घाट, दक्षिण द्वीपकल्प, गंगेचा मैदानी प्रदेश, ईशान्य विभाग व बेटांपर्यंतच्या वेगवेगळ्या भूप्रदेशांच्या विविध जैव-भौगोलिक परिस्थितीमुळे भारतात पक्षी पर्यटनाच्या प्रचंड क्षमता आहेत. भारतात सस्तन प्राणी,पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आणि फुलपाखरे यांच्या अंदाजे 91,000 प्रजाती आहेत. जगात पक्ष्यांच्या 11,000 प्रजाती असून भारतात त्यातील 1,300 प्रजाती आढळतात.
अतिरिक्त महासंचालक रुपिंदर ब्रार यांनी वेबिनारची सांगता करताना भारताच्या जैव-विविधतेविषयी आणि पर्यटनामुळे आपण स्थानिक समुदायाशी कसे जोडले जातो याविषयी माहिती दिली.
देखो अपना देश वेबिनर आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured वर उपलब्ध आहेत.
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680358)
Visitor Counter : 497