उपराष्ट्रपती कार्यालय

आरोग्य सचिवांकडून उपराष्ट्रपतींना इलुरुतील आरोग्यविषयक परिस्थितीची माहिती

Posted On: 12 DEC 2020 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2020


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाचे सचिव राजेश भुषण यांनी उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांना आंध्र प्रदेशातील इलुरू येथील सध्याची आरोग्यविषयक परिस्थिती  आणि तिथे भेट देणाऱ्या केंद्रीय समितीचे प्राथमिक निष्कर्ष याबद्दल माहिती दिली. 

आंध्र प्रदेशातील इलुरू येथे बरेचजण निदान न होऊ शकलेल्या आजाराने रुग्णालयात भरती होत असल्याच्या  पार्श्वभूमीवर ही माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. 

केंद्रीय पथक दिल्लीत परतल्यावर याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल आणि त्याप्रमाणे  संबंधित यंत्रणेला उपयुक्त सल्ला दिला जाईल, असे सचिवांनी सांगितले.

इलुरूमधील रुग्णसंख्या झपाट्याने खाली आली व 11 डिसेंबर, 2020 रोजी फक्त दोन केसेस आढळून आल्या, अशी माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. उपराष्ट्रपती नायडूंनी आरोग्यसचिवांना परिस्थितीवर लक्ष ठेवून सर्व आवश्यक उपाय योजण्यास सांगितले.

इलुरुमधील काहीजणांना चक्कर येणे, अशक्तता, डोकेदुखी आणि उलट्या यांचा त्रास झाला. अद्याप या त्रासाचे कारण वा स्वरूप समजु शकलेले नाही. या संदर्भात  उपराष्ट्रपतींनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी तेथील परिस्थितीबद्दल चर्चा केल्यानंतर केंद्राने 8 डिसेंबर, 2020 ला वैद्यकीय तज्ञांचे पथक इलुरूला पाठवले आहे.


* * *

G.Chippalkatti/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680272) Visitor Counter : 140