रेल्वे मंत्रालय

15 डिसेंबर, 2020 पासून सुरू होणाऱ्या रेल्वे भर्ती परीक्षांसाठी तयारी जोरात सुरु

Posted On: 11 DEC 2020 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020

 

भारतीय रेल्वे आपल्या  21 रेल्वे भर्ती मंडळामार्फत 15 डिसेंबर, 2020 पासून तीन टप्प्यांत महाभरती मोहीम आयोजित करत आहे. यात देशभरातील 1.4 लाख रिक्त जागा भरण्यासाठी 2.44  कोटीहून अधिक उमेदवार विविध शहरांमध्ये हजेरी लावतील. परीक्षा आयोजित करण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे.

परीक्षेचा पहिला टप्पा 15  डिसेंबर 2020  पासून 18 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू राहील.

15 डिसेंबर 2020 पासून सुरू होणाऱ्या सीईएन -03 / 2019 (स्वतंत्र आणि मंत्री श्रेणी) साठी उमेदवारांना आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर  दिलेल्या लिंकद्वारे परीक्षेचे ठिकाणतारीख आणि वेळ याबद्दल ईमेल व एसएमएसद्वारे कळवले जाईल. सर्व आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर ई-कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठीची  लिंक परीक्षेच्या तारखेच्या 4 दिवस अगोदर लाईव्ह केली जाईल. भरतीच्या पुढील टप्प्यांबाबत निवेदन  योग्य वेळी जाहीर केले जाईल.

सामाजिक अंतर, मास्क, सेनिटायझर्सचा अनिवार्य वापर, दररोज फक्त दोन शिफ्टमध्ये परीक्षा असे उपाय सरकारने केले असून सरकारने निश्चित केलेल्या प्रमाणित नियमावलीचे पालन करून कोविड 19 महामारीच्या काळात मोठया प्रमाणावर परीक्षा घेण्यासाठी आरआरबीने व्यापक तयारी केली आहे.

शक्य तितक्या उमेदवारांना त्यांच्या स्वत: च्या राज्यात सामावून घेतले जावे जेणेकरुन ते रात्रभर प्रवास करून त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचू शकतील यासाठी आरआरबीद्वारे प्रयत्न केले जात आहेत. महिला आणि दिव्यांग  उमेदवारांना त्यांच्या मूळ राज्यात सामावून घेण्यात आले आहे.

थर्मो गन वापरुन उमेदवारांचे तापमान तपासले जाईल. विहित मर्यादेपेक्षा जास्त तापमान असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या ठिकाणी आत जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. यासंदर्भात अशा प्रकारच्या उमेदवारांच्या परीक्षा नंतर घेण्यासंदर्भात त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर माहिती पाठविली जाईल. अशा उमेदवारांच्या फेरपरीक्षेची  नेमकी तारीख त्यानंतर कळवली जाईल. उमेदवाराने त्याचा स्वतःचा फेस मास्क वापरला पाहिजे. उमेदवारास प्रवेशाच्या वेळी निर्धारित फॉर्मेटमध्ये कोविड -19 स्वयंघोषणापत्र  सादर करावे लागेल आणि ते नसल्यास  त्याला परीक्षेच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार  नाही.

कोविड 19 बाबत केंद्र व संबंधित राज्य सरकारांनी जारी केलेल्या नवीन सूचना, मार्गदर्शक तत्वे आणि  आदेशांचे पालन केले जाईल व ते सुनिश्चित केले जाईल.

 

 M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680066) Visitor Counter : 493