वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत आणि स्वीडन दरम्यान लवचिक आणि भक्कम भागीदारी निर्माण होण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज- पियुष गोयल

Posted On: 11 DEC 2020 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2020

भारत आणि स्वीडन यांच्यातली भागीदारी अधिक लवचिक आणि मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे, असं मत, केंद्रोय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केले.भारत-स्वीडन व्यापार  रणनीती भागीदारी विषयक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचावर बोलतांन ते म्हणाले, की 2020 हे आव्हानात्मक वर्ष होते मात्र आपण या संकटाचे संधीत रुपांतर करायला हवे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याच्य, समृद्धीच्या नव्या उंचीवर पोहोचण्याच्या आणि 21 व्या शतकातल्या आधुनिक जगात स्पर्धा करण्यास आमच्या प्रयत्नात स्वीडन आमचा भागीदार असलेला आम्हांला आवडेल, असे गोयल म्हणाले. दोन्ही देशातल्या मैत्रीपूर्ण भागीदारीचा विस्तार करण्यात आणि भारताच्या वृद्धी होत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत स्वीडनच्या भागीदारीसाठी या मंचाची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

135 कोटी लोकसंख्येच्या या विशाल देशात जगातल्या सर्वोत्तम उद्योग-व्यवसाय संधी आहेत. आमच्या देशात, खूप मोठा आणि प्रगतीशील मध्यमवर्ग आहे, ज्यांना आपल्या जीवनमनात सुधारणा करण्याची इच्छा आहे. स्वीडीश कंपन्यांना भारतात काम करत या संधींचा उपयोग करायला आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानावर आम्ही संध्या भर देत असून यामुळे भारताचा प्राधान्यक्रम कदाचित बदलू शकेल, त्यात स्वीडनची भूमिका महत्वाची ठरू शकेल असे गोयल म्हणाले.

आत्मनिर्भर भारताविषयी बोलतांना ते म्हणाले की, आम्ही उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या आयातीवर भर दिला आहे. तंत्रज्ञान, कौशल्य, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि दर्जेदार शिक्षण भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उत्पादन क्षेत्रात देशांतर्गत आणि परदेशी कंपन्या आल्यास, त्यातून भारतीयांचे उत्पन्न वाढेल, अर्थव्यवस्थेचा विस्तार होण्यास मदत होईल, असे गोयल म्हणाले. कोणत्याही इतर लोकशाही देशांप्रमाणेच स्वीडनही आत्मनिर्भर भारताचा भाग बनू शकेल. यात स्वीडिश कंपन्याची भूमिका महत्वाची ठरु शकेल, असे ते म्हणाले. स्वीडन जगातला महत्वाचा संशोधक देश आहे आणि विविध क्षेत्रात  नवनवे तंत्रज्ञान आणण्यात आघाडीवर असतो. त्यामुळे भारताला या भागीदारीचा मोठा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.

स्वीडन आणि युरोपीय महासंघाने भारतासाठी आपली दारे अधिक मुक्त करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परस्पर व्यापारात येणाऱ्या अडचणी बाजूला केल्यास दोन्ही बाजूंनी उद्योग व्यवसायात वाढ होऊ शकेलअसे ते म्हणाले.

भारतात अधिकाधिक थेट परदेशी गुंतवणूक यावी, यासाठी सरकारी नियमात लवचिकता आणि मुक्त धोरणे आणण्यावर पंतप्रधानांचा भर असून, हा मंच म्हणजे स्वीडन कंपन्यांना भारतात येण्यासाठी आवाहन करण्याची अपूर्व संधी आहे, असे गोयल म्हणाले.

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680042) Visitor Counter : 237