शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी लिहिलेल्या ‘मानवता के प्रणेता: महर्षी अरविंद’ या पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण अशा आशयाच्या, माध्यमांमध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2020 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 9 डिसेंबर 2020
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 5 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रपती भवनात ‘मानवता के प्रणेता: महर्षी अरविंद’ या केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण केले, अशा आशयाच्या बातम्या काही माध्यमांमध्ये येत होत्या.
या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात येत आहे की, वर उल्लेख केलेल्या पुस्तकाचे अनावरण राष्ट्रपतींनी केलेले नाही. किंबहुना, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट म्हणून दिली होती.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1679355)
आगंतुक पटल : 173