गृह मंत्रालय
युएनसीटीएडीचा मानाचा "2020 संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार" मिळविल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इन्व्हेस्ट इंडिया’चे केले अभिनंदन
“या उल्लेखनीय यशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक पातळीवर गुंतवणुकीसाठी प्राधान्य मिळावे आणि देशात व्यापार करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी केलेले अथक प्रयत्न आणि त्यांचे दूरदर्शी नेतृत्व दिसून येते”
प्रविष्टि तिथि:
08 DEC 2020 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020
युएनसीटीएडी अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विषयक परिषदेकडून देण्यात येणारा या वर्षीचा संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार मिळविल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि सुलभीकरण करण्यासाठी स्थापन केलेल्या संस्थेचे अभिनंदन केले आहे.
“युएनसीटीएडीचा 2020 या वर्षासाठीचा संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार मिळविल्याबद्दल ‘इन्व्हेस्ट इंडिया’चे अभिनंदन. या उल्लेखनीय यशातून, भारताला जागतिक पातळीवर गुंतवणुकीसाठी प्राधान्य मिळावे आणि देशात व्यापार करणे अधिक सुलभ व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले अथक प्रयत्न आणि त्यांचे दूरदर्शी नेतृत्व दिसून येते” असे शहा यांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन पुरस्कार हा गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांसाठी अत्यंत मानाचा पुरस्कार आहे. गुंतवणूक प्रोत्साहनाचे काम करणाऱ्या जगभरातील संस्थांच्या उल्लेखनीय यशाचा आणि उत्तम कामाचा या पुरस्काराद्वारे सन्मान होतो. या वर्षीचा विजेता निवडण्यासाठी एकूण 180 संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात आले. युएनसीटीएडीच्या जिनिव्हा येथील मुख्यालयात 7 डिसेंबर 2020 ला झालेल्या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
‘इन्व्हेस्ट इंडिया’ने महामारीच्या वातावरणात देखील हाती घेतलेले बिझनेस इम्युनिटी प्लॅटफॉर्म; एक्सक्लुझिव्ह इन्व्हेस्टमेंट फोरम नावाची वेबिनार मलिका यासारखे उत्तम उपक्रम, समाज माध्यमांचा समर्पक वापर, आणि व्यापाराची नव्याने उभारणी, भागधारकांशी संपर्क आणि पुरवठादारांशी संपर्क यासाठी उभारलेली कोविड रिस्पॉन्स टीम हे मुद्दे युएनसीटीएडीने यासंबंधी प्रकाशित केलेल्या लेखात नमूद केले आहेत.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1679165)
आगंतुक पटल : 289