उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींच्या हस्तक्षेपानंतर केंद्रातील वैद्यकीय तज्ञांचे पथक आंध्र प्रदेशातील इलुरू येथे रवाना
इलुरू येथील मुलांना अज्ञात आजाराने ग्रासल्याचे वृत्त कळताच उपराष्ट्रपतींची आरोग्य मंत्र्यांशी चर्चा
Posted On:
07 DEC 2020 7:37PM by PIB Mumbai
आंध्रप्रदेशातील इलुरू इथल्या गावातल्या अनेक मुलांना गेल्या काही दिवसांपासून एका अज्ञात आजाराने ग्रासले असून उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी यासंदर्भात आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर तीन वैद्यकीय तज्ञांचे केंद्रीय पथक त्वरित इलुरूकडे रवाना झाले आहे.
300 पेक्षा जास्त मुलांना या आजाराची बाधा झाल्याचे वृत्त कळताच, उपराष्ट्रपतींनी आधी स्थानिक जिल्हाधिकारी आणि नंतर मंगलगिरी तसेच दिल्लीच्या एम्सच्या संचालकांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर डॉ हर्षवर्धन यांच्याशीही चर्चा करुन. आजाराचे निदान झाल्यावर उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची सूचना दिली.
या मुलांच्या रक्ताचे मनुने तपासणीसाठी पाठवले असून, आजाराचे निदान झाल्यावर त्वरित योग्य ते उपचार केले जातील अशी ग्वाही, आरोग्यमंत्री आणी एम्सच्या संचालकांनी दिली.
या गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षणही केले जात आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.या असर्व मुलांना ग्लानी, चक्कर येणे, मळमळ आणि डोकेदुखी असे त्रास होत आहेत. एम्सचा विषबाधा नियंत्रक तज्ञांचा चमूही इलुरूच्या डॉक्टरांच्या संपर्कात असल्याची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली.
****
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678907)
Visitor Counter : 283