सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया अंतर्गत असलेल्या एनबीसीएफडीसी आणि एनएसएफडीसी यांचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार

Posted On: 07 DEC 2020 6:37PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय मागासवर्गीय वर्ग वित्त व विकास महामंडळ (एनबीसीएफडीसी) आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एनएसएफडीसी) यांनी प्रमुख व सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियासमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वंचित इकाई समूह और वरगों की आर्थिक सहाय्यता  (VISVAS) या योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओबीसी/अनुसूचित जाती बचत गट आणि व्यक्तींच्या आर्थिक सबलीकरणासाठीची ही योजना आहे.

या योजनेमुळे ओबीसी/एससी बचत गटांना 4 लाख रुपयांपर्यंतची कर्ज आणि ओबीसी/एससी व्यक्तींना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल तसेच कर्ज घेणार्‍या स्वयं सहायता बचत गटांच्या/लाभार्थ्यांच्या थेट खात्यात 5% व्याज अनुदानाचा लाभ मिळेल.

करारावर सेंट्रल बँकेच्या वतीने प्रादेशिक महाव्यवस्थापक व्ही. के. महेंद्रू, एनबीसीएफडीसीच्या वतीने महाव्यवस्थापक अनुपमा सूद, एनएसएफडीसीच्या वतीने मुख्य महाव्यवस्थापक देवानंद यांनी स्वाक्षरी केली. एनबीसीएफडीसी चे अध्यक्ष/एनएसएफडीसीचे अध्यक्ष व महासंचालक के. नारायण यावेळी उपस्थित होते. या योजनेचा लाभ देशभरातील बऱ्याच उद्योजकांना होईल.

***

S.Thakur/S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678875) Visitor Counter : 175