पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

“भारतासाठी नवनिर्मिती करा” धर्मेंद्र प्रधान यांचे वैज्ञानिक समुदायाला आवाहन

Posted On: 05 DEC 2020 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  5 डिसेंबर 2020

केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वैज्ञानिक समुदायाला भारतासाठी नवनिर्मिती करा(I4I) आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी स्पर्धात्मक लाभ मिळवून देण्यासाठी तयार करा, असे आवाहन केले. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 6 व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2020 (India International science Festival 2020 )च्या द्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. धर्मेंद्र प्रधान यांनी वैज्ञानिकांना, जगातील उत्तम उत्पादने आणि सेवा यांच्याशी स्पर्धा करू शकतील अशा प्रकारची उत्पादने आणि सेवा  तयार करण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर भारत आणि जागतिक समृध्दी’ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.

प्रधान म्हणाले, की आपण सर्व क्षेत्रांत संस्थात्मक आणि औद्योगिक सामर्थ्य तसेच वैज्ञानिक ज्ञान आणि नवनिर्मिती यांचा विकास आणि सबलीकरण करुन त्यात वाढ करायला हवी, हे कोविड-19 या जागतिक महामारीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.ते म्हणाले, की आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ भारताने स्वतःच्या आवश्यकता पूर्ण करणे असा नसून ,जागतिक समुदायाला आशेचे किरण दाखवून द्यावेत, म्हणजे खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम्, ही भावना सत्यात उतरेल.

केंद्रीय मंत्री प्रधान पुढे म्हणाले ,की आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याशिवाय आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश लाभणार नाही. त्यांनी वैज्ञानिक समुदायाला संशोधनाच्या प्रगत संकल्पना आणि आधुनिक वैज्ञानिक अन्वेषणांवर आधारीत गणिती पध्दती यांत भारताचा समृद्ध वारसा समाविष्ट करावा असे आवाहन केले, जेणेकरुन अशा पध्दतींच्यामागील रहस्ये उलगडली जातील आणि शास्त्रीय पध्दतीने ती  निर्विवादपणे  सिध्द होतील.

 

S.Thakur/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678583) Visitor Counter : 112