संरक्षण मंत्रालय

सशस्त्र सेना ध्वज दिन सीएसआर परिषद: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्योगांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारपणे योगदान देण्याचे केले आवाहन

Posted On: 04 DEC 2020 9:03PM by PIB Mumbai

 

सशस्त्र सेना ध्वज दिन सीएसआर परिषदेच्या दुसऱ्या भागाचे आज  04 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे वेबिनारच्या स्वरुपात आयोजन करण्यात आले होते. वेबिनारचे अध्यक्षस्थान भूषविताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, देशाच्या विकासात खासगी क्षेत्राची भूमिका आणि महत्त्व सरकारने जाणले आहे.  2014 पासून, एनडीएचे सरकार सत्तेत आल्यापासून सरकारने खासगी क्षेत्राच्या विकासाला  प्रोत्साहन दिले आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, संरक्षण क्षेत्र जिथे खासगी क्षेत्राला बिलकुल प्रवेश नव्हता तिथे आता भारतीय खाजगी क्षेत्राचेही स्वागत केले जात आहे. संरक्षण क्षेत्रात खासगी क्षेत्रातील सहभागास प्रोत्साहित करण्यासाठी काही क्रांतिकारक पावले उचलण्यात आली आहेत आणि योग्य फायदा घेण्यासाठी उद्योगांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संरक्षण मंत्री म्हणाले की देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना होणाऱ्या लढाईत आपल्या सैन्याला कधीकधी प्राण गमवावे लागतात किंवा त्यांना अपंगत्व येते. म्हणूनच आमच्या माजी सैनिकांचे पुनर्वसन व त्यांचे कल्याण, आमच्या हुतात्म्यांचे नातेवाईक व अपंग सैनिकांची जबाबदारी ही सर्व नागरिकांची आहेअसे संरक्षण मंत्री म्हणाले. ते म्हणाले, "ध्वजदिन आम्हाला एएफएफडी निधीमध्ये योगदान देऊन ही जबाबदारी पार पाडण्याची संधी प्रदान करतो." आपल्या माजी सैनिकांच्या सेवा भावनेचा पुनरुच्चार करताना संरक्षण मंत्री म्हणाले की कोविड -19 साथीच्या कठीण काळातही त्यांनी स्थानिक प्रशासनाला संपर्क शोध, समुदाय देखरेख आणि विलगीकरण व्यवस्थापन इत्यादी कामांमध्ये मदत केली आहे.

संरक्षण मंत्री म्हणाले की, गेल्या काही वर्षात सीएसआरच्या माध्यमातून भारतीय उद्योगाच्या उदार योगदानामुळे एएफएफडीएफमध्ये भरीव वाढ झाली आहे. गेल्या वर्षी उद्योगांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी  उद्योगांचे आभार मानले आणि या उदात्त कार्यात आपले योगदान असेच सुरू ठेवण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले.

माजी सैनिक कल्याण विभागाचे सचिव, रवीकांत म्हणाले, केंद्रीय सैनिक मंडळ (केएसबी) माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. केएसबीचे सचिव बी. अहलुवालिया यांनी सशस्त्र सैन्य ध्वज दिन निधीतून देण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन आणि कल्याणासाठी धोरण निश्चित करणारी केएसबी ही भारत सरकारची सर्वोच्च संस्था आहे. केएसबी हे एएफएफडीएफचे प्रशासकीय नियंत्रक आहे.

एएफएफडी निधीचा उपयोग कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सैनिकांचे कुटुंबीयय  किंवा अपंगत्व आलेले सैनिक, वृद्ध, निवृत्तीवेतन नसलेले सैनिक, विधवा आणि अनाथ मुले यांच्या पुनर्वसन आणि कल्याणासाठी केला जातो. त्यांना दारिद्र्य (पेनरी) अनुदान, शिक्षण अनुदान, विधवा / कन्या विवाह अनुदान इत्यादी विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते.

सध्या, येथे 32 लाखांहून अधिक माजी सैनिक आहेत आणि लवकर सेवानिवृत्ती घेतल्यामुळे दरवर्षी सुमारे सहा लाख विधवा आणि 60,000 ईएसएम जोडले जात आहेत.

एएफएफडीएफचे कॉर्पोरेट योगदान कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 135 अंतर्गत सीएसआर दायित्व पूर्ण करण्यास पात्र आहेत कारण "सशस्त्र सैन्य सैनिक, युद्ध विधवा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठीच्या उपायांचेयात पालन केले आहे.

एएफएफडीएफला दिलेल्या योगदानास आयकर कायदा 1961 च्या कलम 80 जी (5) (vi) अंतर्गत प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे.

या परिषदेमध्ये संरक्षण उत्पादन सचिव राज कुमार आणि उद्योजक तसेच सीएसआर प्रमुख सहभागी झाले होते.

मागील वर्षांप्रमाणेच 07 डिसेंबर 2020 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन संपूर्ण देशात साजरा केला जाईल. 1949 पासून हा देशाच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या सीमेवर शौर्य गाजविणाऱ्या शहिदांचा आणि सैन्यात कार्यरत असलेल्या महिला व पुरुष सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

******

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678443) Visitor Counter : 151