अर्थ मंत्रालय
एफपीआय, एफडीआय आणि कॉर्पोरेट रोखे बाजारातील निधींचा ओघ दाखवतोय भारतीय विकासाचा चढता आलेख
Posted On:
01 DEC 2020 4:32PM by PIB Mumbai
कोविड–19 महामारीमुळे जगभरातील सर्व अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे सर्वत्र मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोल बिघडला आहे. अचानकपणे जगाला बसलेल्या या आर्थिक धक्क्याला भारत काही अपवाद नाही. तरीही, जागतिक महामारीच्या आपत्तीकालीन परिस्थितीत देखील भारत सरकारने कार्यक्षमपणे वेळोवेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीची प्रेरणा तरली आहे.
एफपीआय, एफडीआय आणि कॉर्पोरेट रोखे बाजारातील निधींच्या ओघाचा कल यांच्या मदतीने भारतीय विकासाचा आलेख चढता ठेवण्यात सरकारला यश आलेले दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सशक्तता आणि लवचिकपणा यांच्यावर गुंतवणूकदारांचा किती दृढ विश्वास आहे हेच यातून दिसून येते.
I. एफपीआय अर्थात पोर्टफोलियोतील परदेशी गुंतवणूक
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या गेल्या दोन महिन्यात एफपीआयद्वारे देशात गुंतवणुकीसाठी आलेल्या निधींच्या प्रमाणात मोठी वाढ होऊन त्याने उच्चांक गाठला आहे. 28 नोव्हेंबर 2020 ला एफपीआयसाठीचा निधी 62,782 कोटी रुपये होता. यापैकी ईक़्विटी मध्ये 60,358 कोटी तर डेट आणि हायब्रीड मध्ये 2,424 कोटी रुपये गुंतवण्यात आले.
राष्ट्रीय सुरक्षा ठेव मर्यादित या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात एफपीआयमध्ये गुंतवणुकीने नोव्हेंबर महिन्यात उच्चांक गाठला.
II. एफडीआय अर्थात थेट परदेशी गुंतवणूक
या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण 28,102 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची एफडीआय झाली. त्यामुळे, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सप्टेंबरपर्यंत एफडीआय ईक़्विटीमार्फत 30,004 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली जी आधीच्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत झालेल्या गुंतवणुकीपेक्षा 15% नी जास्त आहे असे दिसून येते. म्हणजेच, एफडीआय ईक़्विटीमध्ये 224,613 कोटी रुपयांची म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा 23% जास्त गुंतवणूक झाली. या कालावधीत ऑगस्ट या एकाच महिन्यात सर्वात लक्षणीय म्हणजे 17,487 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली.केंद्र सरकारने एफडीआय धोरणात केलेले बदल, गुंतवणुकीसाठी सुविधांची उभारणी तसेच व्यवसाय करण्याचे सुलभ मार्ग यामुळे एफडीआय मध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
Total FDI Flows (US$ Million)
Year (Financial)
|
FDI Equity Inflows
|
Total FDI Flows
|
2014-15
|
29737
|
45148
|
2015-16
|
40001
|
55559
|
2016-17
|
43478
|
60220
|
2017-18 (P)
|
44857
|
60974
|
2018-19 (P)
|
44366
|
62001
|
2019-20 (P)
|
49977
|
74390
|
Source: DPIIT
III. रोखे बाजार
या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत एकूण 4.43 लाख कोटी रुपयांचे कॉर्पोरेट रोखे वितरीत झाले जे गेल्या वर्षी याच कालावधीत वितरीत झालेल्या 3.54 लाख कोटी रुपये किमतीच्या कॉर्पोरेट रोख्यांपेक्षा 25% नी जास्त आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील नव्या सुगम सुधारणा आणि रोखतेच्या नव्या नियमांमुळे डेट बाजारातील फायदा कमी झाला.
*******
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677532)
Visitor Counter : 186