भारतीय स्पर्धा आयोग
अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य समभाग नोंदणीच्या माध्यमातून स्प्रिंग कॅन्टर इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (एससीआयएल) कडून रिव्हिगो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रिव्हिगो) च्या अधिग्रहणाला सीसीआयने दिली मंजुरी
Posted On:
01 DEC 2020 1:10PM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धा कायदा 2002 च्या कलम 31(1) अंतर्गत अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य समभाग नोंदणीच्या माध्यमातून स्प्रिंग कॅन्टर इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (एससीआयएल) कडून रिव्हिगो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रिव्हिगो) च्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे.
एससीआयएल ही एक गुंतवणूक धारक कंपनी आहे जी मॉरीशसच्या कायद्यांतर्गत स्थापन झाली आहे आणि भारतात त्यांचे कोणतेही प्रत्यक्ष अस्तित्व नाही. वारबर्ग पिनकस एलएलसी (वारबर्ग) द्वारे व्यवस्थापित काही खासगी इक्विटी फंड त्याचे भागधारक आहेत.
वॉरबर्ग ही अमेरिकेत न्यूयॉर्क येथे मुख्यालय असलेली एक खासगी इक्विटी फर्म आहे तसेच ती काही खासगी इक्विटी फंडाचे व्यवस्थापक म्हणून काम करते. खासगी इक्विटी फंडाच्या मालकीच्या पोर्टफोलिओ कंपन्या या ऊर्जा, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा, फार्मा, सामान्य विमा, ग्राहक, औद्योगिक आणि व्यवसाय सेवा, तंत्रज्ञान, मीडिया आणि दूरसंचार यासह विविध क्षेत्रात सक्रिय आहेत.
रिव्हिगो ट्रकिंग उद्योगातील तंत्रज्ञान-सक्षम लॉजिस्टिक कंपनी आहे. ते एक अभिनव ‘ड्रायव्हर रिले’ मॉडेल वापरतात ज्यामुळे ट्रक उद्योगाच्या सरासरीच्या तुलनेत वेगाने अधिक अंतर कापू शकतात. त्याच्या पूर्ण स्टॅक लॉजिस्टिक ऑफरमध्ये रिले-प्रणित ट्रकिंग आणि फ्रेट मार्केटप्लेस समाविष्ट आहे. हे असंख्य मालवाहतूक कंपन्या आणि ज्यांच्याकडे वाहनांचा ताफा आहे अशा लॉगींजिस्टीक क्षेत्रातल्या कंपन्यांना कमी वाहन संख्येत जास्तीत जास्त परिणाम साध्य करण्यासाठी सक्षम करते आणि संपूर्ण डिजिटल आणि पारदर्शक प्रणालीद्वारे संपूर्ण मालवाहतूक परिसंस्थेत बदल घडवून आणण्याचे याचे उद्दिष्ट आहे. .
सीसीआयचा विस्तृत आदेश लवकरच उपलब्ध होईल.
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677397)
Visitor Counter : 210