युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय

काही उदयोन्मुख खेळाडूंसह दुती चंद आणि केटी इरफान यांचा टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेच्या कोअर गटात समावेश

Posted On: 29 NOV 2020 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  29 नोव्हेंबर 2020

 

26 नोव्हेंबरला झालेल्या 50 व्या एमओसी बैठकीत टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेच्या मुख्य गटात 8 ट्रॅक आणि फील्ड ऍथलिटचा समावेश करण्यात आला.

टीओपीएस मुख्य  गटात धावपटूंचा समावेश करण्याचा निर्णय त्यांच्या कामगिरीतील  प्रगतीवर आणि पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी त्यांची पात्रता किंवा पात्रतेच्या उच्च संभाव्यतेवर आधारित होता. टीओपीएस योजनेत पुढील  खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले - शिवपाल सिंग (पुरुषांचा भाला फेक गट आणि ऑलिम्पिकसाठी पात्र), अन्नू राणी (महिला भालाफेक खेळाडू ), केटी इरफान (पुरुषांचा  20 किमी वॉक आणि ऑलिम्पिकसाठी पात्र), आरोकीया राजीव (पुरुष 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले) ), नोहा निर्मल टॉम (पुरुषांची 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले), अ‍ॅलेक्स अँथनी (पुरुषांची 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले), एमआर पूवम्मा (महिला 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले) आणि दुती चंद (महिला 100 मीटर आणि 200 मीटर). 2019 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र  4x400 मीटर रिलेमध्ये भारताने ऑलिम्पिक कोटा मिळवला होता.

कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर, नीरज चोपडा, हिमा दास आणि तजिंदर पाल सिंग तोर यांच्यासह टीओपीएस योजनेत सहभागी असलेल्या  9 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. ट्रिपल जम्पर अर्पिंदरसिंग याला या योजनेतून वगळण्यात आले.

टीओपीएस  विकास गटात खालील 7 खेळाडूंचा समावेश करण्यात आला: हर्ष कुमार (पुरुष 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले), वीरमणी रेवती (महिला 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले), विद्या आर (महिला 400 मीटर आणि 4x400 मीटर रिले), तेजस्विन  शंकर (पुरुषांची उंच  उडी), शैली सिंग (महिलांची लांब उडी), सँड्रा बाबू (महिलांचा तिहेरी उडी) आणि हर्षिता सेहरावत (महिला हॅमर थ्रो).

 

Jaydevi P.S./S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1677019) Visitor Counter : 8