शिक्षण मंत्रालय
कोविड-19 महामारीच्या काळात शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या विविध उपक्रमांच्या संकलनाचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते झाले प्रकाशन
Posted On:
27 NOV 2020 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज शालेय शिक्षण विभागाने कोविड-19 महामारीदरम्यान राबवलेल्या विविध उपक्रमांच्या संकलनाचे दूरस्थ पद्धतीने प्रकाशन केले.
वर्ष 2020- 21 मध्ये कोविड-19 महामारीच्या कारणामुळे जगातील जवळपास सर्व देश आणि प्रांत यांना सार्वजनिक आरोग्यासंबंधीच्या अभूतपूर्व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जावे लागले, असे सांगत मंत्रीमहोदय म्हणाले की या महामारीने दैनंदिन जीवनात अनेक अडथळे निर्माण केले आणि मुलांवर त्याचा परिणाम तर झालाच शिवाय देशातील शाळा बंद ठेवाव्या लागल्या.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने या काळात PM ई- विद्या, प्रज्ञाता मार्गदर्शक नियमावली, मनो-सामाजिक आधारासाठीचा मनोदर्पण, ई-कन्टेन्ट, पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर असे अनेक कार्यक्रम पुढाकार घेत राबवले. कोविड-19 महामारीच्या कारणामुळे शालेय विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात मागे पडू नये असा उद्देश या कार्यक्रमांमागे होता. महामारीच्या परिणामांना आळा घालण्यास हे कार्यक्रम बऱ्याच अंशी कारणीभूत ठरले असे सांगून संकलनाचे प्रकाशन करताना मंत्रिमहोदयांनी याबद्दल आनंद व्यक्त केला.
आतापर्यंतच्या परिस्थितीत शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत बदल तसेच फेरविचार करण्यासाठी मंत्रालयाने अनेक उपायोजना राबवल्या. शाळेतील शिक्षण आणि घरबसल्या शालेय शिक्षण यांचे योग्य प्रकारे एकत्रीकरण करून दर्जात्मक शिक्षण देण्यासाठी अनेक दर्जेदार पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीची मंत्रीमहोदयांनी यावेळी प्रशंसा केली.
कोविड-19 महामारीदरम्यान शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या उपक्रमांचे संकलन पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676573)
Visitor Counter : 272