रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मोटार मालकाला वाहनाचे नामनिर्देशन करता येण्यासाठीच्या प्रस्तावित सुधारणांवर जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत
Posted On:
27 NOV 2020 2:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केंद्रिय मोटार वाहन अधिनियम, 1989 यामधे मोटार मालकाला वाहनाचे नामनिर्देशन (RCमध्ये नामनिर्देशन) करता येण्यासाठीच्या सुधारणांवर सर्वसामान्याकडून तसेच संबधितांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. मसूद्याची 26 नोव्हेंबर 2020 रोजीची जाहीर सूचना GSR 739 (E) मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नामनिर्देशन प्रस्तावानुसार वाहनाची नोंदणी करतानाच नामनिर्देशनाची सोय अंतर्भूत असेल. यामुळे वाहनाच्या मालकाच्या मृत्यूनंतर वाहनाची नोंदणी नामनिर्देशित व्यक्तीच्या नावे नोंदवली/हस्तांतरीत करण्यास मदत होईल. ही प्रक्रिया सध्या त्रासदायक आणि देशभरात एकसमान नाही.
केंद्रीय मोटर वाहन अधिनियम 1989 मधील प्रस्ताव पुढीलप्रमाणे आहेत :-
(a) नियम 47 मोटारवाहनाच्या नोंदणीसाठी अर्ज :- यामध्ये “नामनिर्देशित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा असल्यास देणे”, हा जास्तीचा भाग असेल जेणेकरून मोटारमालकाला आपल्या मृत्यूनंतर कोणालाही वाहनाचा कायदेशीर मालक करता येईल.
(b) नियम 55 मालकीहक्काचे हस्तांतरण :- उपनियम (2) मध्ये एका अतिरिक्त कलमाची भर टाकता येईल ज्यामध्ये “नामनिर्देशित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा असल्यास देणे” हा जास्तीचा भाग असेल जेणेकरून मोटारमालकाला आपल्या मृत्यूनंतर कोणालाही वाहनाचा कायदेशीर मालक बनवता येईल.
(c) नियम 56. म़ृत्यू झाल्यास (i) उपनियम (2), जो वाहनाचे नोंदणीकृत वाहनमालकाने नामनिर्देशन केले नसल्याच्या परिस्थितीत वाहनाचे कायदेशीर वारसाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात आहे. त्यामध्ये अतिरिक्त कलम टाकता येईल. त्यामध्ये “नामनिर्देशित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा असल्यास देणे” हा भाग असेल जेणेकरून मोटारमालकाला नामनिर्देशन करणे शक्य होईल.
(d) नविन उपनियमाचा समावेश यामधील जो प्रस्तावित आहे त्यानुसार जर नामनिर्देशन आधीच केले गेले असेल तर वाहन नामनिर्देशित व्यक्तीच्या नावावर होईल. त्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीने नोंदणी अधिकाऱ्याच्या माहितीसाठी वाहनमालकाचा मृत्यूचा दाखला पोर्टलवर टाकणे आवश्यक आहे. तसेच पोर्टलमार्फतच आपल्या नावावर नवीन नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा. त्याने आधार प्रमाणीकरण स्विकारले असल्यास ही नोंदणी फेसलेस असेल.
एखाद्या आकस्मिक कारणाने नामनिर्देशन बदलावयाचे असल्यास विशिष्ठ परिस्थितीत नामनिर्देशन बदलण्याचा प्रस्ताव. काही आकस्मिक कारण जसे की घटस्फोट, मिळकतीची वाटणी, मिळकतीची विक्री न करता काही ठराविक मानक प्रक्रियेचे पालन करत (SOP) मिळकतीचे हस्तांतरण करतानाचे नामनिर्देशन हे वाहनमालकाला करणे शक्य होईल.
(e) Rule 57. खुल्या लिलावात वाहन खरेदी केली असल्याच्या परिस्थितीत वाहनाच्या मालकी हक्काचे हस्तांतरण:- उपनियम (1) नुसार जो वाहनाच्या नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या संदर्भातील आहे, त्यात अतिरिक्त कलमाचा समावेश करता येईल. ज्यामध्ये “नामनिर्देशित व्यक्तीची ओळख पटवणारा पुरावा असल्यास देणे” हा जास्तीचा भाग असेल जेणेकरून मोटारमालकाला आपल्या मृत्यूनंतर कोणालाही वाहनाचा कायदेशीर मालक बनवता येईल.
(f) FORM 20, Form 23 A, 24, 30, 31 and 32 मध्ये सुधारणा प्रस्तावित आहे. ज्यामध्ये नामनिर्देशित व्यक्तीचा तपशील आणि तो तपशील नोंदवण्यास नोंदणीकृत मालकाचे डिक्लरेशन.
उपजिल्हादंडाधिकारी /जिल्हादंडाधिकारी/न्यायाधिकरण/ न्यायालये यांनी दिलेले प्रमाणपत्र/आदेश सुद्धा नामनिर्देशनाच्या या नागरिकसुलभ सेवेसाठी ग्राह्य धरण्यात यावेत आणि या प्रस्तावित सुधारणात त्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
या मसूद्यातील नियमांवर हरकती व सुचना असल्यास, त्या सहायक सचिव (MVL), ला इमेल आयडी director-morth[at]gov[dot]in वर किंवा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, ट्रान्सपोर्ट भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली 110 001 या पत्त्यावर या जाहिर सूचनेच्या प्रसिद्धी दिवसापासून 30 दिवसांच्या आत पाठवाव्यात.
* * *
U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676439)
Visitor Counter : 216