राष्ट्रपती कार्यालय
संविधान दिनाच्या उद्घाटनानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे भाषण
Posted On:
26 NOV 2020 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 26 नोव्हेंबर 2020
संविधान दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. तुमच्या सर्वांशी वैयक्तिकरित्या संवाद साधण्यात मला अधिक आनंद झाला असता, परंतु साथीच्या रोगाने आपल्यावर बंधन घातले आहे.
आज आपली घटना स्वीकारल्याला 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1979 पासून सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या आवाहनावरून कायदे तज्ञ दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘कायदा दिन’ म्हणून साजरा करत होते. 2015 मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सरकारने 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
आमच्या स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ दूरदर्शी नेत्यांनी आमच्या राज्यघटनेचे दस्तऐवज तयार केले आहेत. ते लोकांच्या वतीने व्यापक प्रमाणात राष्ट्राचे सामूहिक भवितव्य लिहित आहेत याची त्यांना जाणीव होती. संविधान सभेच्या वादविवादात लोकांनी देखील आपली रुची दर्शविली होती. नोंदीनुसार, जवळपास तीन वर्षांच्या कालावधीत 53,000 पेक्षा जास्त नागरिक अभ्यागतांच्या गॅलरीत बसले आणि त्यांनी वादविवाद पाहिले.
बंधू आणि भगिनींनो,
आमची राज्यघटना सर्वात मोठे दस्तऐवज असल्याचे म्हटले जाते. परंतु नंतर, संविधान सभा अध्यक्ष राजेन बाबूंनी विचार केला की, यामधील तरतुदी योग्यरित्या मांडल्या तर याचा मोठा दस्तावेज असणे ही मोठी समस्या ठरणार नाही. ही भावना प्रस्तावनेमध्ये सुंदरपणे मांडली आहे. केवळ पंच्याऐंशी शब्दांत, स्वातंत्र्यलढ्यास चालना देणारी मूळ मूल्ये स्पष्ट केली आहेत.
प्रस्तावनेला राज्यघटनेचा गाभा म्हणून पाहिले जाते आणि त्याच्या मुळाशी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व ही काही मूल्ये आहेत. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या समारोप भाषणात त्यांचे महत्त्व विशद केले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
या उदात्त आदर्शांना आपल्या जीवनशैलीत सामावून घेणे हे आपले प्रमुख कार्य आहे.
सर्वांसाठी न्यायप्रक्रिया सुगम्य होणे हे कार्य निश्चितच प्रगतीपथावर सुरु आहे. यामार्गात अनेक अडथळे आहेत, आणि यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे शुल्क.
आणखी एक अडथळा म्हणजे भाषा आणि मला आनंद वाटतो की उच्च न्यायपालिकेने अधिकाधिक प्रादेशिक भाषांमध्ये आपले निर्णय उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.
दुसरीकडे अनेक निराकरणे/उपाययोजना देखील आहेत. तंत्रज्ञान हे त्यापैकी अग्रगण्य म्हणून उदयास येत आहे. मला हे पाहून आनंद झाला की सर्वोच्च न्यायालयाने तांत्रिक उपायांचा वापर करून साथीच्या आजाराच्या काळात देखील न्याय दानाचे कार्य चालूच ठेवले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
या प्रसंगी आपण उदात्त आदर्शांना आपल्या जीवनाचा भाग बनवण्याच्या कार्यावर अधिक विचार करूया.
बंधू आणि भगिनींनो,
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या उच्च गुणवत्तेसाठी आणि उच्च आदर्शांसाठी नावलौकिक मिळविला आहे. मला विश्वास आहे की हे न्यायालय नेहमीच न्यायाचे मुख्य केंद्र राहील.
मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
जय हिंद!
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676263)
Visitor Counter : 209