वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
अपेडाने जर्मनीसोबत खरेदीदार विक्रेता बैठकीचे केले आभासीपद्धतीने आयोजन
प्रविष्टि तिथि:
26 NOV 2020 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 26 नोव्हेंबर 2020
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी व प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) आपल्या मान्यताप्राप्त कृषी व प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यात करण्यासाठी अनेक निर्यात प्रोत्साहन उपक्रमांचे आयोजन करत असते.
कोविड 19 साथीच्या काळातही, अपेडाने आभासी माध्यमातून कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आयात करणाऱ्या देश आणि तिथल्या भारतीय मिशनच्या सहकार्याने, खरेदीदार विक्रेते यांच्या अनेक आभासी बैठका आयोजित करण्यात आल्या.
याचाच एक भाग म्हणून, भारतातील ताजी फळे आणि भाज्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी 25 नोव्हेंबर 2020 रोजी जर्मन आयातदारांच्या व्हर्च्युअल नेटवर्किंग बैठकीचे आयोजन केले होते. अपेडा, भारतीय दूतावास, बर्लिन आणि जर्मन अॅग्रीबिजनेस अलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात 70 हून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
याप्रसंगी बर्लिनमधील भारतीय मिशनच्या उपाध्यक्ष परमिता त्रिपाठी, अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू आणि जर्मन अॅग्रीबिजनेस अलायन्सच्या अध्यक्षा ज्युलिया हर्नल यांनी उपस्थितांना संबोधित केले.
अपेडाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू यांनी आपल्या भाषणात भारतीय जीआय आणि सेंद्रिय उत्पादने तसेच प्रक्रिया केलेल्या उत्पादने ही निर्यातक्षम असल्याचे सांगितले. बर्लिनमधील भारतीय मिशनच्या उपाध्यक्ष परमिता त्रिपाठी यांनी भारतीय फळांची अनोखी चव आणि दर्जा यामुळे त्यांना मागणी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात भारतीय कृषी उत्पादनांच्या बळकटीवर विशेषतः द्राक्ष आणि ताजी फळे व भाजीपाला याविषयी सादरीकरण केले. जर्मन बाजाराच्या आवश्यकता व अपेक्षांचे सादरीकरण देखील करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे ताजी फळे आणि भाज्यांच्या निर्यातीतली भारताची क्षमता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले तसेच भारतीय कृषी उत्पादनांबाबत जर्मन खरेदीदारांचा विश्वास वाढण्याबरोबरच आणि निर्यातीला चालना मिळाली.
Jaydevi P.S/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1676139)
आगंतुक पटल : 233