सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेच्या छापील आवृत्तीमध्ये वापरलेली  रेखाटने आणि सुलेखन हा माहितीपट प्रदर्शित

Posted On: 25 NOV 2020 9:11PM by PIB Mumbai

 

केंद्रिय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली (डीएआयसी) यांची निर्मिती असलेला ```भारतीय राज्यघटनेच्या छापील आवृत्तीमध्ये वापरलेली   रेखाटने आणि सुलेखन``` नावाचा माहितीपट आज ई - प्रदर्शित (आभासी माध्यमातून) केला.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रमण्यम, डीएआयसीचे संचालक विकास त्रिवेदी आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातील आणि डीएआयसीचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित होते.

समारंभास संबोधित करताना थावरचंद गेहलोत म्हणाले की, 26 नोव्हेंबर 2020 रोजी `71 वा संविधान दिवस` हा वर्षभर साजरा करण्याबाबत भारत सरकारने निर्णय घेतला आहे आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडे या उपक्रमाचे नोडल मंत्रालय म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राने (डीएआयसी) राज्यघटनेची यशस्विता साजरी करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये डॉ. आंबेडकर आणि राज्यघटना यावरील  व्याख्यानांचे आयोजन आहे आणि याशिवाय ``भारतीय राज्यघटनेच्या छापीलआवृत्तीमध्ये वापरलेली   रेखाटने आणि सुलेखन``` नावाच्या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

भारताचे संविधान तयार  करताना  अनेक  हस्तलिखित आणि हाताने रंगवलेली चित्रं  तसेच भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरा दर्शविणाऱ्या भित्तिचित्रांच्या प्रतिमा यांचा वापर करण्यात  आला होता. संविधानाच्या छापील आवृत्तीमधील मूळ चित्रं शांतिनिकेतन येथील विश्व भारतीमधील   चित्रकार  आणि विद्वानांनी काढली होती.  डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथील संशोधकांनी या सर्व दस्तावेजांचा अभ्यास करून तसेच विश्व भारतींशी संबंधित तज्ज्ञांशी चर्चा  केल्यानंतर ,ती समृद्ध विरासत उलडून दाखवण्याचा प्रयत्न दर्शविणारा हा  माहितीपट आहे. एक उत्कृष्ट आणि अद्वितीय माहितीपट तयार केल्याबद्दल श्री गेहलोत यांनी डीएआयसीच्या चमूचे कौतुक केले आहे.

......

Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675861) Visitor Counter : 96