दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मंत्रीमंडळाने मेसर्स एटीसी एशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मेसर्स एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील 2480.92 कोटी रुपयांच्या थेट विदेशी गुंतवणूकीला मंजूरी दिली.
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2020 7:37PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील, आर्थिक व्यवहार विषयक मंत्रीमंडळ समितीने ,मेसर्स एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड च्या 12.32% इक्विटी शेअर्सच्या भाग भांडवलाचे अधिग्रहण करण्यासाठी मेसर्स टाटा टेलि सर्व्हिसेस आणि टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पुट ऑप्शनचा उपयोग करत, विदेशी गुंतवणूक करायला मेसर्स एशिया पॅसिफिक पीटीई लिमिटेडला मंजुरी दिली.
यामुळे 2480.92 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक देशात येणार आहे.
यामुळे मेसर्स एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड(ATC INDIA)एटीसीची एशिया पँसिफिक पीटीई लिमिटेड यातील(ATC SINGAPORE),यांची 2018-19 ते 2020-21 या वर्षांतील एकत्रित गुंतवणूक 5417.2 कोटी रुपये इतकी झाली आहे.
तपशील :
मेसर्स एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, टेलिकॉम आँपरेटर्सना टेलिकॉम मधील पायाभूत सुविधा आणि सेवा देण्यात गुंतलेली आहे.
या कंपनीला सध्या 86.37%पर्यंत विदेशी गुंतवणूक करण्यासाठी अनुमती होती, आता या मंजुरीमुळे ती वाढून 98.68%पर्यंत जाईल.
मेसर्स एटीसी एशिया पॅसिफिक पीटीई लिमिटेड कंपनीची मेसर्स एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आर्थिक वर्ष 2018-19 मधील विदेशी गुंतवणूक 2480.92 कोटी रुपये इतकी होती ,आता क्रमांक 4854 आणि क्रमांक 4860 या मंजुरी प्रस्तावांमुळे आर्थिक वर्ष 2020-21 साठी एकूण 5417.2 कोटी रूपये इतकी होईल.
प्रभाव:
यामुळे भारतातील विदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळून आर्थिक विकासाला आणि नवनिर्मितीला चालना मिळेल.
पार्श्वभूमी:
दूरसंचार सेवा क्षेत्रात 100% विदेशी गुंतवणूकीला परवानगी आहे, त्यापैकी 49% स्वयंचलीत मार्गाने आणि 49% सरकारी मार्गाने ,गुंतवणूकदारांना सूचित केलेल्या परवाना तसेच सुरक्षित अटींवर तसेच वेळोवेळी दूरसंचार विभागाने अधिसूचित केलेल्या नियमांनुसार ही गुंतवणूक करता येते.
ही कंपनी टेलिकॉम आँपरेटर्सना, पँसिव्ह पध्दतीने ,दूरसंचार विभागाने दिलेल्या मंजूरीनुसार विविध सेवा प्रदान करण्याच्या कार्यात गुंतलेली आहे.
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1675778)
आगंतुक पटल : 180