सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
थावरचंद गेहलोत उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे तामिळनाडूच्या पुडुकोटाई येथील 1398 दिव्यांग व्यक्तींना मदत व सहाय्यक उपकरणे पुरवण्यासाठी एडीआयपी शिबिराचे उद्घाटन करणार
Posted On:
23 NOV 2020 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 23 नोव्हेंबर 2020
थावरचंद गेहलोत उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे “तामिळनाडूच्या पुडुकोटाई येथील 1398 दिव्यांग व्यक्तींना मदत व सहाय्यक उपकरणे पुरवण्यासाठी एडीआयपी शिबिराचे उद्घाटन करणार आहेत.” भारत सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत पुडुकोटाई जिल्ह्यातील ब्लॉक स्तरावर दिव्यांग व्यक्तींची ओळख पटवून त्यांना मदत व सहाय्यक उपकरणांच्या विनामूल्य वितरणासाठी तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पुडुकोट्टाई जिल्ह्यातील एकूण 1398 लाभार्थ्यांना 117 लाख किंमतीची 2547 सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येतील. पुडुकोट्टाई जिल्ह्यातील 09 वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये गट निहाय वितरण केले जाईल.
उद्घाटन शिबिरात पुडुकोट्टाई मधील 64 लाभार्थ्यांना 24.8 लाख रुपये किंमतीची 131 सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. वितरीत केल्या जाणाऱ्या मदत आणि सहाय्यक उपकरणांमध्ये 04 हँड प्रोपेल्ड ट्रायसायकल, 11 व्हील चेअर, 14 सीपी चेअर, 12 कुबड्या, 04 वॉकिंग स्टिकस, 09 रोलेटर, 09 स्मार्ट केन, 04 स्मार्ट फोन, 04 टॅब्लेट, 03 डेझी प्लेयर , 20 हियरिंग एड, 17 एमएसआयईडी किट आणि 20 कृत्रिम अवयव आणि कॅलिपर यांचा समवेश आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण विभागांतर्गत कार्यरत आर्टिफिशियल लिंब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एआयएलएमसीओ), कानपूर, यांनी पुडुकोट्टाई जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले आहे. कोविड 19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मंजूर मानक कार्यप्रणाली (एसओपी) नुसार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
मदत आणि सहाय्यक उपकरणांच्या वितरणादरम्यान कोविड-19 च्या संसर्गाचा कोणताही धोका होऊ नये तसेच आरोग्य आणि वैयक्तिक सुरक्षितता आणि इतर सर्व आवश्यक सावधगिरीची काळजी घेऊनच या मदत आणि सहाय्यक उपकरणांचे वितरण केले जाईल. 24 नोव्हेंबर 2020 रोजी या कार्यक्रमात थेट सहभागी होण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे: https://youtu.be/EjDWQrcEmPg
M.Iyengar/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675102)
अभ्यागत कक्ष : 150