अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
320 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या 28 अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी
प्रकल्पामुळे 10,000 पेक्षा अधिक रोजगारांची होणार निर्मिती
नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली आयएमएसीची बैठक
Posted On:
21 NOV 2020 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग, कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 320.33 कोटी रुपये खर्चाच्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांना 107.42 कोटी रुपये अनुदानासह एमओएफपीआय कडून मंजुरी देण्यात आली. 10 राज्यात मंजूर झालेल्या या प्रकल्पांमुळे 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात ईशान्य भारतातील 6 प्रकल्पांचा समावेश आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या आयएमएसीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र सिंह तोमर होते. पंतप्रधान किसान संपदा योजनेच्या (पीएमकेएसवाय) अंतर्गत अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमता वाढविणे, विस्तार (सीईएफपीपीसी) (घटक योजना) या प्रकल्पांचा विचार यावेळी विचार करण्यात आला. अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली हे देखील या बैठकीला उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रवर्तकांनी देखील या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला.
या 28 प्रकल्पांद्वारे मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू काश्मिर, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आसाम आणि मणिपूर या राज्यांमध्ये दररोज 1237 मेट्रिक टन अन्न प्रक्रिया क्षमता तयार होईल. हे 28 प्रकल्पा ज्यामध्ये ईशान्येकडील राज्यांमधील 6 प्रकल्पांचा समावेश आहे, त्या प्रकल्पांची किंमत 48.87 कोटी रुपये आणि त्यास 20.35 कोटी रुपये अनुदान एमओएफपीआयच्या वतीने देण्यात येणार आहे.
* * *
S.Tupe/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674768)
Visitor Counter : 204
Read this release in:
English
,
Punjabi
,
Kannada
,
Malayalam
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Tamil
,
Telugu