पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
ई आणि पी विभागातल्या ओएएलपी लिलावाच्या पाचव्या फेरीसाठी करारावर स्वाक्षरी
बाजारपेठेला अनुकूल ओएएलपीमुळे ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबनाकडे वाटचाल-धर्मेंद्र प्रधान
Posted On:
17 NOV 2020 6:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 17 नोव्हेंबर 2020
ओएएलपी म्हणजेच मुक्त एकरेज परवाना धोरण ( ओएएलपी) बाजारपेठेला अनुकूल असल्यामुळे ऊर्जा क्षेत्र स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते तेल आणि वायूच्या ई आणि पी विभागातल्या 11 ओएएलपी लिलावाच्या पाचव्या फेरीसाठी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी प्रधान म्हणाले, ‘एचईएलपी’- हेल्पच्या काळामध्ये कार्य यशस्वी होत असून आता ओएएपी लिलावाच्या फेऱ्या वाढवून भारतामध्ये मुक्त एकरेज क्षेत्रामध्येही वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 80,000 चौरस किमी क्षेत्रफळामध्ये अन्वेषण करण्यात आले आहे. आधी केलेल्या कामाचा यामध्ये समावेश केला तर आत्तापर्यंत 2,37,00 चौरस किमी. क्षेत्रामध्ये मुक्त एकरेज परवाना धोरणाअंतर्गत काम झाले आहे.
या धोरणामुळे संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये परिवर्तन घडून आल्याचे सांगून मंत्री प्रधान म्हणाले, ओएएलपीमुळे लालफितीचा कारभार आता मोडीत निघाला आहे. तसेच निरनिराळ्या विभागांचा शोध घेऊन उत्पादन क्षेत्रांमध्ये खूप लक्षणीय वाढ करणे शक्य झाले आहे. कोणताही व्यवसाय आहे तसाच सुरू ठेवावा असा दृष्टीकोन जाऊन आता उद्योगामध्ये वेगाने वृद्धी करण्याची महत्वाकांक्षा दिसून येत आहे. त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादनाचा वेग वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि व्यवसायाचे नवीन मॉडेल आणण्याचे आवाहन धमेंद्र प्रधान यांनी यावेळी केले.
यावेळी 8 ठिकाणच्या तळखोऱ्यातील 11 विभागातल्या एकूण 19,789.04 चौरस किमी. क्षेत्रातल्या कामासाठी ओएएलपीच्या पाचव्या फेरीचे लिलाव करण्यात आले. यासाठी 465 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ओएनजीसीला 7 विभागाचे काम देण्यात आले. तर 4 विभागाचे काम आॅइल इंडिया लिमिटेडकडे सोपविण्यात आले आहे.
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673507)
Visitor Counter : 169