राष्ट्रपती कार्यालय

धोरण निर्मात्यांनी राष्ट्रीय हिताबरोबरच आंतरराष्ट्रीय उद्देशांची प्रेरणा घेऊन उभय स्तरावर अनुकूल आणि बहुआयामी असण्याची आवश्यकता - राष्ट्रपती रामनाथ कोविंद


‘एनडीसी’च्या 60व्या अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभामध्ये राष्ट्रपतींनी दूरदश्य माध्यमाव्दारे केले मार्गदर्शन

Posted On: 13 NOV 2020 10:25PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे की, आज संपूर्ण जगातल्या प्रत्येक देशापुढे अनेक आव्हाने आहेत, त्या आव्हानांना सामोरे जाताना धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या व्यक्तींनी राष्ट्रीय हिताबरोबरच आंतरराष्ट्रीय उद्देशांची प्रेरणा घेऊन आपले उद्देश अधिक लवचिक उभय स्तरावर अनुकूल आणि बहुआयामी ठेवण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रपतींनी आज ( दि. 13 नोव्हेंबर, 2020) दूरदृश्य माध्यमाव्दारे एनडीसीअर्थात राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाच्या  60 व्या अभ्यासक्रमाच्या  समारोप समारंभामध्ये मार्गदर्शनपर भाषण केले.

याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले, काही देशांच्यावतीने विस्तारवादाचा अनुसरण केले जात आहे, त्याविषयी योग्य रणनीति आणि परिपक्व प्रतिक्रिया वैश्विक स्तरावर निर्माण होण्याची आवश्यकता आहे. या पृष्ठभूमूीवर  एनडीसीच्यावतीने अशा अनेक आव्हानांचा सामना केला जातो आणि भविष्यातील बहु-आयामी भूराजनैतिक आणि भौगोलिक-राजकीय वातावरण जाणून घेण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये त्या अनुषंगाने साधने उपलब्धही करून देण्यात येत आहेत.

राष्ट्रपती यावेळी म्हणाले की, एनडीसीने केवळ आमच्या सशस्त्र दलाच्या आणि नागरी सेवेतील वरिष्ठ अधिका-यांना कौशल्य आणि ज्ञान प्रदान केले आहे, असे नाही, तर त्यांना आपल्या देशाचे उद्देश्य आणि लक्ष्य यांच्याविषयी धोरणात्मक निर्णय घेताना या अभ्यासक्रमामुळे मदत मिळते. या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी एक व्यापक पाठ्यक्रम तयार केला आहे आणि त्यामध्ये सुरक्षित जगाच्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी प्रशिक्षण आणि ज्ञान प्रदान करण्यात येते. परंतु दहशतवादरहित जग असेल तरच एक सुरक्षित जग  निर्माण होवू शकणार आहे. मानवतेला एक मोठा शाप असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना कराव्या लागत असलेल्या अनेक देशांच्या दृष्टीने हा एक आंतरराष्ट्रीय महत्वाचा विषय बनला आहे. अलिकडेच यूरोपीय देशांमध्ये झालेल्या हत्यांच्या घटना निषेधार्ह आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी शब्दही नाहीत. कोणत्याही स्वरूपातला दहशतवाद निंदनीय असून, अशा दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने शांततेसाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांना हरताळ फासला जात आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

द प्रेसिडेंटस् चेअर ऑफ एक्सलन्सी ऑन नॅशनल सिक्यूरिटीया संस्थेचा उल्लेख करून राष्ट्रपती म्हणाले, या महान संस्थेच्या हीरक महोत्सव काही दिवसांपूर्वीच एनडीसीमध्येसाजरा करण्याची एक चांगली संधी मिळाली. या संस्थेमुळे भारताच्या या  सर्वोच्च सामरिक शिक्षण संस्थेमध्ये बौद्धिक आणि शैक्षणिक मानक समृद्ध होईल. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे संपूर्ण भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.

 

Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1672809) Visitor Counter : 156