भारतीय स्पर्धा आयोग

जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचे 7.73 टक्के समभाग भांडवल अधिग्रहणासाठी स्पर्धा आयोगाची गुगल आंतरराष्ट्रीय एलएलसीला मान्यता

Posted On: 12 NOV 2020 12:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2020

 

सीसीआय म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाने स्पर्धा कायदा, 2002 च्या 31 (1) कलमाअंतर्गत जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचे 7.73 टक्के समभाग भांडवल अधिग्रहणासाठी गुगल आंतरराष्ट्रीय एलएलसीला (जीआयएल) मान्यता दिली आहे. 

जीआयएल ही गुगलच्या मालकीची सहाय्यक कंपनी असून गुगल एलएलसी ही डेलावेअर लिमिटेडचे दायित्व असलेली कंपनी आहे. तसेच या कंपनीची संपूर्ण मालकी अल्फाबेट या उपकंपनीकडे आहे. जीआयएल ही एक होल्डिंग कंपनी असून कोणत्याही प्रकारचे उत्पादन अथवा सेवेची निर्मिती करीत नाही तसचे मालकी अथवा संचालनही करीत नाही. 

जेपीएल ही रिलायन्स उद्योग मर्यादित समुहाची सहाय्यक कंपनी आहे. या कंपनीचे बहुतांश भाग भांडवल जीपीएलमध्ये आहे. जेपीएलने आपलया सहाय्यक कंपन्यांसह प्रामुख्याने वायरलेस, होम ब्रॉडबँड आणि एटंरप्राइस ब्रॉडबँड, दूरसंचार सेवा, मोबाइल अॅप्लिकेशन्स, आणि इतर विविध डिजिटल सुविधा, ई-कॉमर्ससाठी बॅक-एंड टेक्नॉलॉजी, त्याचबरोरब विविध सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानविषयक सेवा देत आहे. 

स्पर्धा आयोगाने या अधिग्रहणासंबंधी दिलेल्या आदेशाचे अनुसरण करण्यात येईल.  

 

* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1672223) Visitor Counter : 162