संरक्षण मंत्रालय
इक्वेस्ट्रियन फेडरेशन ऑफ इंडिया (EFI)कडून फेडरेशन इक्वेस्ट्रीयन इंटरनॅशनल (FEI) चे 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान आयोजन
Posted On:
11 NOV 2020 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2020
आर्मी पोलो आणि घोडेस्वारी केंद्रात 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान फेडरेशन इक्वेस्ट्रीयन इंटरनॅशनल (FEI) स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
घोडेस्वारी/अश्वारोहण, क्रॉस कंट्री आणि शो जंपिंग या तीन विभागातील चाचण्यांचे एकत्रीकरण या कार्यक्रमात असेल. कमीत कमी पेनल्टी घेणारा एथलिट स्वतःच्या श्रेणीतील विजेता असेल. म्हणजेच एक स्टार इन्ट्रो टू स्टार शॉर्ट.
स्पर्धा चार दिवस घेतल्या जातील. पहिल्या दिवशी पशुवैद्यकीय तपासणी, दुसऱ्या दिवशी घोडेस्वारी/अश्वारोहण चाचणी, तिसऱ्या दिवशी क्रॉस कंट्री आणि शो जंपिंग चाचणी शेवटच्या दिवशी होईल.
घोडेस्वारी चाचणी ही 60मी X 20मी क्षेत्रफळाच्या क्षेत्रात होतील. या भागाच्या बाहेर ठराविक जागी खुणेची निशाणी असेल. घोडेस्वाराला हॉल्ट, वॉक, ट्रॉट, कॅन्टर इत्यादी विविध प्रकार चाचणीसाठी दिलेल्या क्रमाने करून दाखवावे लागतील. प्रत्येक प्रकाराला 10 पैकी गुण दिले जातील आणि सर्व परिक्षकांनी दिलेल्या गुणांची सरासरी काढून घोडेस्वारीसाठीचे/अश्वारोहणाचे अंतिम गुण दिले जातील व ते टक्केवारीच्या स्वरुपात दाखवले जातील.
दुसऱ्या दिवशी घोडेस्वारांसाठी क्रॉस कंट्री आयोजित केली जाईल. त्यासाठी ठराविक अंतर दिले जाईल. त्या अंतरादरम्यान ठराविक वेळेत पार करता येण्यासाठी विविध अडथळे ठराविक अंतरावर ठेवले जातील. अडथळे पार करण्यात आलेल्या प्रथम अपयशासाठी 20 पेनल्टी, त्याच जम्पसाठी दुसरा प्रयत्न अपयशी ठरल्यास 40 पेनल्टी आणि त्याच जम्पसाठी तिसरा प्रयत्न अपयशी ठरल्यास स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. घोडा वा घोडेस्वार वा दोघेही अडखळून पडल्यास स्पर्धेतून बाहेर केले जाईल.
शो जंपिंग हा स्पर्धेतील शेवटचा आणि आयोजनातील अंतिम टप्पा. हा शो-जंपिंगसाठी तयार केलेल्या 60 मी X 40 मी क्षेत्रफळाच्या भागात घेतला जाईल. प्रत्येक अपयश वा अडथळ्यापाशी मागे फिरल्यास 4 पेनल्टीज लावल्या जातील. आणि तिसऱ्या अपयशाच्या वेळी स्पर्धेतून बाहेर केले जाईल.
अंतिम निकालासाठी तीनही चाचण्यांचे एकत्रित गुण विचारात घेतले जातील. 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडा पथकाने वैय्यक्तिक व सांघिक या दोन्ही प्रकारात रौप्य पदक मिळवल्यापासून EFI हा युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने प्राधान्यक्रम दिलेला क्रीडाप्रकार आहे. या क्रीडाप्रकारात अनुस्युत असलेली शिस्त हा भारताचे पारंपारिक बळ आहे त्यामुळे गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने या प्रकारात सर्वाधिक पदके प्राप्त केली होती.
भारतात FEI क्रीडा स्पर्धांचा आरंभ हा 2022 या वर्षात चीनमध्ये भरवल्या जाणार असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या तयारीचा एक भाग आहे. साधारणतः 50 उत्कृष्ट घोडेस्वार आणि 60 घोडे या स्पर्धेत भाग घेतील आणि विजेता म्हणून पोडियमवर स्थान मिळवण्यासाठी तीव्र चुरस असेल.
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671954)
Visitor Counter : 150