संरक्षण मंत्रालय
पिनाक रॉकेट प्रणालीच्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
04 NOV 2020 8:53PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डिआरडीओ) विकसित केलेल्या पिनाक रॉकेटच्या सुधारीत आवृत्तीची ओदिशा किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी केंद्र, चांदीपूर येथून आज यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली. सुधारीत पिनाक प्रणाली पूर्वीच्या कमी लांबीच्या तुलनेत दूरच्या टप्प्यातील कार्यक्षमता प्राप्त करेल अशापद्धतीने विकसित केली आहे. पिनाक आराखडा आणि विकास पुणेस्थित डिआरडीओ प्रयोगशाळा अर्मामेन्ट संशोधन आणि विकास संस्था, एआरडीई आणि हाय एनर्जी मटेरिअल्स संशोधन प्रयोगशाळा, एचईएमआरएल यांनी केला आहे.
अतिशय कमी वेळेत सहा रॉकेट सोडले आणि चाचणीचे उद्दिष्ट साध्य केले.
चाचणी केलेल्या रॉकेट्सची निर्मिती मेसर्स इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड, नागपूर यांनी केली असून ज्यांना तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे. टेलिमेट्री, रडार आणि इलेक्ट्रो ऑप्टीकल ट्रॅकिंग सिस्टम सारख्या रेंज उपकरणांच्या माध्यमातून सर्व उड्डाणांचा मागोवा घेण्यात आला, ज्यात उड्डाण कामगिरीची पुष्टी केली.
पिनाकची सुधारीत आवृत्ती सध्याच्या पिनाक एमके- I रॉकेटची जागा घेईल.
*****
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1670218)
आगंतुक पटल : 323