ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

यावर्षी एमएसपी दराने विक्रमी धान खरेदीचा अंदाज - पीयुष गोयल


परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सक्रिय पावले उचलत आहे

Posted On: 30 OCT 2020 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020

गेल्या वर्षीच्या  627 लाख मेट्रिक टन च्या तुलनेत चालू खरीप पिकांच्या हंगामात भारतीय अन्न महामंडळ आणि राज्य संस्था 742 लाख मेट्रिक टन इतकी विक्रमी धान खरेदी करण्यासाठी सज्ज आहेत. खरीप 2020-21 साठी खरेदी केंद्रांची संख्याही 30,709 वरून 39,122 करण्यात आली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ग्राहक व्यवहा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष  गोयल म्हणाले की बाजारपेठेत धान लवकर आल्यामुळे खरेदीचा हंगाम 26/09/2020 पासून सुरु झाला.

यंदा विक्रमी धान खरेदीचा अंदाज

परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केल्या जात असलेल्या सक्रिय उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली-

14/09/2020 पासून कांद्याच्या निर्यातीवर सक्रिय बंदी घालण्यात आली आहे. खासगी कंपन्यांकडून आयातीला डीजीएफटीने परवानगी दिली आहे. 23/10/2020 पासून घाऊक विक्रेत्यासाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टन आणि किरकोळ विक्रेत्यासाठी 2 मेट्रिक टन करण्यासाठी आवश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे.  2020 पासून कांदा बियाणे निर्यात करण्यास बंदी असून जनतेला कांद्याच्या चढ्या दरापासून दिलासा देण्यासाठी अतिरिक्त साठ्यातून कांदा उपलब्ध करून दिला जात आहे.

सरकार माफक दरात बटाटा उपलब्ध करून देण्यासाठी  पावले उचलत असल्याचे  यापूर्वी बटाट्यावर आयात शुल्क 30% होते. आता, 31/01/2022 पर्यंत 10 लाख मेट्रिक टन बटाट्याच्या आयातीसाठी 10% शुल्क अधिसूचित केले आहे.

त्याचप्रमाणे डाळींचे दर नियंत्रित करण्यासाठी पावले उचलली आहेत. मूग, उडीद  आणि तूर डाळ अतिरिक्त साठ्यातून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवली जात आहे. पुढील 15 दिवसांत अतिरिक्त साठ्यातून  2 लाख मेट्रिक टन तूर खुल्या बाजारातील विक्रीतून उपलब्ध केला जाईल.

 

S.Thakur/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1668930) Visitor Counter : 185