उपराष्ट्रपती कार्यालय
केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपतींनी केला शोक व्यक्त
Posted On:
29 OCT 2020 8:10PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उपराष्ट्रपतींचा शोक संदेश खालीलप्रमाणे आहे -
‘‘गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.
केशुभाई एक लोकप्रिय नेते होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब आणि वंचितांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. केशुभाई एका शेतकरी परिवारातून आलेले होते, त्यामुळे त्यांना शेतकरी बांधवांचा कळवळा होता, त्यांनी शेतक-यांच्या कल्याणासाठी अथक कार्य केले. निसर्गाशी आणि मातीशी केशुभाईंची नाळ घट्ट जोडली होती, त्यामुळेच त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे देशातल्या ग्रामीण भागातल्या आणि शेतकरी बांधवांच्या मनात केशुभाईंना विशेष स्थान प्राप्त झाले.
सामान्य कौटुंबिक पृष्ठभूमीतून आलेल्या केशुभाईंनी केलेले कठोर परिश्रम आणि त्यांच्यामध्ये असलेला साधेपणा अनुकरणीय होता. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचल्यानंतरही त्यांच्या स्वभावातला नम्रपणा कायम होता; ते पूर्वीप्रमाणेच सर्वांना सहजपणे भेटू शकत होते.
केशुभाई पटेल यांच्या निधनामुळे देशाने एक महान नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबातील शोकग्रस्त सदस्यांविषयी आणि त्यांच्या स्नेहींविषयी मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती !’’
***
B.Gokhale/S.Sheikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668607)