ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी लिमिटेडचा हरित उपक्रमाअंतर्गत जपान सरकारच्या वित्तीय संस्थेसोबत 50 अब्ज जपानी येनसाठी परदेशी चलन ऋण करार
Posted On:
28 OCT 2020 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2020
जपान बँक फॉर इंटरनॅशनल को -ऑपरेशनच्या(जेबीआयसी) हरित किंवा आर्थिक सहकार्य आणि पर्यावरण संवर्धन यासाठीच्या जागतिक सहकार्य कृतीअंतर्गत भारताची सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक असलेल्या एनटीपीसी लिमिटेडला प्रथमच वित्तपुरवठा होणार आहे. यासाठी एनटीपीसी लिमिटेडने आज जपान सरकारच्या वित्तीय संस्थेसोबत 50 अब्ज जपानी येनसाठी (सुमारे 482 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किंवा 3,582 कोटी रुपये ) परदेशी चलन ऋण करार केला. जेबीआयसी सुविधा रकमेच्या 60 % रक्कम देणार असून उर्वरित रक्कम वाणिज्य बँका (उदा. सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन, बँक ऑफ योकोहामा लि., सॅन-इन गोडो बँक लि., जॉयो बँक लि. आणि नॅन्टो बँक लि.) जेबीआयसीच्या हमी अंतर्गत देणार आहेत.
जागतिक पर्यावरण संवर्धन सुनिश्चित करणाऱ्या प्रकल्पांसाठी जेबीआयसीची ही सुविधा आहे. वीज मंत्रालयांतर्गत सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनटीपीसीकडून हे कर्ज फ्लू गॅस डिसल्फराइझेशन (एफजीडी) आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी वापरेल. एफजीडीमुळे औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या फ्लू गॅसेसमधील सल्फर ऑक्ससाईड उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करेल आणि पर्यावरण शाश्वततेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल ठरेल.
एनटीपीसीचे (वित्त) संचालक अनिल कुमार गौतम आणि जेबीआयसीचे पायाभूत सुविधा आणि पर्यावरण वित्त गट जागतिक प्रमुख, व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी तानिमोटो मसायुकी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
* * *
S.Thakur/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668186)
Visitor Counter : 188