जलशक्ती मंत्रालय

जल शक्ती मंत्रालयाने लडाख केंद्रशासित प्रदेशात, जल दर्जा चाचणी केंद्रस्थानी ठेवीत,जल जीवन मोहीम कार्यरत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे केले मूल्यमापन

Posted On: 27 OCT 2020 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत ,जल जीवन मोहीम कार्य प्रगतीच्या सुरू असलेल्या  सहामाही  प्रयत्नांचा आढावा घेण्याच्या मालिकेत ,आज लडाख या केंद्रशासित प्रदेशात केलेल्या प्रयत्नांचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे पुनरावलोकन करण्यात आले. जल शक्ती मंत्रालय विविध केंद्रशासित प्रदेशांत, जल जीवन मिशन केंद्र सरकारच्या महत्वाच्या 2024 सालापर्यंत  नळाद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात  सार्वत्रिकपणे  पाणी उपलब्ध करण्याच्या उद्दिष्ट असलेल्या जल जीवन मोहीमेच्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेत आहे.

लडाख येथे  228 गावे आणि 191 ग्राम पंचायती असून  1,421 रहिवास मिळुन सुमारे  44,082 ग्रामीण घरे आहेत.  या केंद्रशासित प्रदशाने 2021-22 पर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरांना 100%नळजोडणी देण्याची योजना तयार  केली असून हे साध्य करण्यासाठी ,केंद्रशासित प्रदेशाला त्याला सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा  वापरण्याची आवश्यकता आहे. लडाखमध्ये 254 गावांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जाते. केंद्रशासित प्रदेश सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक जल पुरवठा (पीडब्ल्यूएस)व्यवस्थेत बदल करून आणि त्यात  सुधारणा   करून  उर्वरित घरांना  नळजोडणी देण्याचे काम करीत आहे.

ग्राम कृती योजना, ग्राम जल आणि स्वच्छता समित्यांची स्थापना  यासारख्या बाबींवर या बैठकीच्या वेळी प्रकाश टाकण्यात आला. या कार्याला कार्यान्वित करण्यासाठी  स्थानिक संस्थांचा आधार घेऊन  या योजनेची कार्यवाही करणे ,कार्यान्वित करणे आणि पाणी पुरवठा यंत्रणेची देखभाल आणि संचालन करण्यासाठी  स्वयंसेवी संस्था ,गैरसरकारी संस्था, महिला एसएचजी यांची मदत घेण्यावर  भर देण्यात आला .केंद्रशासित प्रदेशाला, ग्राम पंचायत कार्यकारिणीचा तसेच इतर सहभागी  संस्थांचा  क्षमता विस्तारप्रशिक्षण करणे याबाबत विचारणा करण्यात आली ,तसेच गाव पातळीवर मनुष्यबळ विकासित करणे, जी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आणि पाणी पुरवठा व्यवस्था कार्यान्वित आणि देखभाल करणे यासाठी मदत करेल. या केंद्रशासित प्रदेशाला पिण्याच्या पाण्याची  स्रोतांची रासायनिक आणि जंतूसंसर्गाबाबत अनिवार्य चाचणी  करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.या मोहिमेअंतर्गत पाण्याच्या दर्जाची चाचणी करणे अनिवार्य आहे.

2020-21या वर्षांसाठी लडाखला 352.09कोटी रुपये निधी देण्यात आला होता. या केंद्रशासित प्रदेशाला गावपातळीवर हा निधी  मनरेगा ,एसबीएम,स्थानिक विभाग विकास निधी (MGNREGS, SBM,)इत्यादी योजनांसह एकत्रितपणे वापर करत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा विकास, जल संवर्धन ,सांडपाण्याचे व्यवस्थापन यासाठी उपलब्ध निधीचे काटेकोरपणे वापर करण्याच्या विनंती करण्यात आली  होती.

लडाखचा थंड वाळवंटी प्रदेश समुद्र सपाटीपासून 3000-3500मीटर उंचीवर असून तेथे वार्षिक 50 मिमी इतका कमी पाऊस पडतो. पर्यटकांचे लोंढे आणि वातावरणातील बदल यामुळे या  नाजूक परिस्थितीतील हिमालयाच्या ऊंच ओसाड प्रदेशात पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय अत्यंत तातडीने उपलब्ध करणेआणि त्याची देखभाल करणे  आवश्यक होते.जलजीवन मोहिमेमुळे ही बाब संपूर्णत: लक्षात घेत "हर घर जल"  या वैशिष्ट्यपूर्ण संधीचा लाभ होत असून लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे.

 

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667952) Visitor Counter : 164