संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे प्रतिनिधी यांच्यामध्ये नवी दिल्ली येथे दि. 27 ऑक्टोबर, 2020 रोजी झालेल्या बैठकीनंतर संरक्षण मंत्र्यांनी केलेले निवेदन

Posted On: 27 OCT 2020 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

प्रतिनिधी पॉम्पीओ, प्रतिनिधी इस्पेर, डॉ. जयशंकर, प्रसार माध्यमातील सदस्य, महिला आणि मान्यवर,

कोविड-19 महामारीची भयावह पार्श्वभूमी असतानाही अमेरिकेचे प्रतिनिधी भारत भेटीसाठी आले, याबद्दल त्यांचे आभार मानतो, तसेच आपल्या व्दिपक्षीय संबंधाबद्दल असलेल्या वचनबद्धतेविषयी मी मनापासून प्रशंसा करतो.

आज झालेल्या बैठकीमध्ये व्दिपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्य यांच्याविषयी व्यापक चर्चा झाली. सध्या आपल्या सर्वांना खूप मोठ्या, अवघड आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच अर्थव्यवस्था पुन्हा सुदृढ करणे आणि वृद्धीच्या दिशेने वाटचाल करतानाच साथीच्या रोगाचा प्रतिबंध करण्याचे आव्हान आहे. त्याचबरोबर जागतिक पुरवठा साखळी आणि त्यासंबंधित सर्व प्रश्नांना आजच्या बैठकीमध्ये प्राधान्य मिळणे अनिवार्य होते.

LEMOA’ वर 2016 मध्ये आणि ‘COMCASA’ वर 2018 मध्ये स्वाक्षरी केल्यानंतर त्या दिशेने महत्वपूर्ण कामगिरी म्हणजे आज भौगोलिक स्थानिक सहकार्य, मूलभूत आदान-प्रदान आणि सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

भारत आणि अमेरिका यांनी यापूर्वी ज्या विषयांवर सहकार्य करण्यासाठी चर्चा केली त्याचाच यापुढेही पाठपुरावा करण्यासाठी उचललेली पावले मी सांगू इच्छितो.

आजच्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या क्षमता निर्माण आणि तिस-या जगतामधील देशांमध्ये असलेल्या संभाव्य क्षमता वृद्धी करणे यासाठी  संयुक्त सहकार्य करण्याविषयी चाचपणी केली. आमच्याकडे अशा प्रकारचे विविध प्रस्ताव विचाराधीन आहेत, त्यांच्यावर कृती करण्यात येईल.

सागरी दक्षता या क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याची विनंती अमेरिकेने मान्य केली आहे, त्याचे मी स्वागत करतो. उभय बाजूंच्या आवश्यकतांचा विचार करून गरजेची कार्यप्रणाली विकसित करणे आणि तज्ज्ञांच्या मदतीने संयुक्त विकास करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

संरक्षण उद्योग सहकार्य क्षेत्राविषयी उभय प्रतिनिधींबरोबर अतिशय उपयुक्त चर्चा झाली. संरक्षण क्षेत्रामध्ये ‘आत्मनिर्भर भारत’ हा मुद्दा अधोरेखित करण्यात आला. संरक्षण उद्योगाच्या दृष्टीने अलिकडच्या काळात पुढे आलेला हा मुद्दा मार्गदर्शक घटक ठरणार आहे. भारतीय संरक्षण उद्योग आणि त्याची अमेरिकेतल्या पुरवठा साखळीमध्ये प्रमुख क्षेत्रामध्ये असलेली उपयुक्तता यांच्यावर मी या चर्चेमध्ये प्रकाश टाकला. निकटच्या काळामध्ये संयुक्तपणे विकास करण्यासाठी  प्रकल्प चिह्नित करण्यात आले. संरक्षण आणि संशोधन आणि विकास कार्य अधिक वेगवान करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेवून डीटीटीआय अंतर्गत जलदगतीने कोणते प्रकल्प हाती घेणे शक्य आहे, यावर चर्चा झाली.

आमच्या बैठकीमध्ये आम्ही इंडो पॅसिफिकमधील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन सामायिक केले. या प्रक्रियेमध्ये आम्ही क्षेत्रीय शांतता, स्थिरता आणि समृद्धी कायम राहण्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी केली. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे पालन करून  नौकावाहतूकीचे स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व कायम ठेवणे आवश्यक असल्याचे आम्ही मान्य केले. आम्ही संरक्षण सहकार्याची उद्दिष्टे पूर्ण करत आहोत. आगामी काळात मलबार कवायतीमंध्ये ऑस्ट्रेलियाचाही सहभाग असणार आहे, त्याचे उभय बाजूंनी स्वागत केले.

प्रतिनिधी पॉम्पीओ आणि प्रतिनिधी एस्पेर यांच्या भारत भेटीचे आम्ही कौतुक करतो. या बैठकीमध्ये आमच्यामध्ये अतिशय रचनात्मक संवाद झाला आणि संरक्षण सुरक्षा त्याचबरोबर इतर क्षेत्रामध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आपण एकत्रित कार्यरत राहू.

B.Gokhale/S.Bedekar/M.Chopade

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667950) Visitor Counter : 224