राष्ट्रपती कार्यालय

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 24 OCT 2020 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात, राष्ट्रपतींनी म्हटले आहे, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मी भारतवासियांना आणि परदेशातील सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो.

हा सण म्हणजे दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा दिवस आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. हा सण भारतातील सांस्कृतिक ऐक्य बळकट करतो आणि आपल्याला सद्गुण, सदाचार या मार्गाचा अवलंब करून सुसंवाद साधत जगण्याची प्रेरणा देतो.

हा सण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या जीवन आणि मूल्यांशी देखील संबंधित आहे. त्यांचे आयुष्य हे नैतिकता आणि मर्यादेचे पालन करण्याचा संदेश आपल्याला देते.

आनंद आणि उत्साहाचा हा सण आपल्याला सध्या सुरू असलेल्या महामारीच्या दुष्परिणामांपासून आपले राखणं करो आणि आपल्या देशवासियांना समृद्धी आणि भरभराट देवो, अशी मी इच्छा व्यक्त करतो.

S.Tupe/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667378) Visitor Counter : 117