उपराष्ट्रपती कार्यालय
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रतींनी दिल्या शुभेच्छा
दसऱ्याचा सण साजरा करताना कोविड-19 संदर्भातील आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे उपराष्ट्रतींचे आवाहन
Posted On:
24 OCT 2020 7:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2020
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रती एम. वेंकैया नायडू यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा सण साजरा करताना कोविड-19 संदर्भातील आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उपराष्ट्रतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.
उपराष्ट्रपतींचा शुभेच्छा संदेश पुढीलप्रमाणे :
“दसऱ्याच्या या पवित्र सणानिमित्त मी देशातील जनतेला शुभेच्छा देतो.
देशभरात अतिशय उत्साहाने साजरा होणारा दसऱ्याचा सण, हा दुष्ट प्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय प्राप्त करण्याचे प्रतीक आहे तसेच देवी दुर्गाद्वारे महिषासुर राक्षसाचा वध करून विजयोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. हा सण आपल्याला भगवान राम यांच्या धार्मिक, सद्गुण आणि उदात्त जीवनाची आठवण करून देतो, जो एक आदर्श मुलगा, आदर्श पती आणि आदर्श राजा आहे आणि धार्मिकता, सत्य आणि नैतिकतेचे मूर्त रूप आहे.
दुर्गापूजा, आयुध पूजा, शमी पूजा, गौरी पूजा, रावणाचा पुतळा जाळणे, बथुकम्मा आणि सिरीमानू हे या उत्सवाचे विविध भाग आहेत.
दसरा हा एक कुटुंब आणि मित्र एकत्र येऊन साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. मात्र यावर्षी कोविडच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर मी सर्वांना आवाहन करतो की दसऱ्याचा सण साजरा करताना कोविड-19 संदर्भातील आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे.
हा उत्सव आपल्या देशात आणि जगात शांती, सुसंवाद आणि समृद्धी आणेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.”
B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667364)
Visitor Counter : 108