अर्थ मंत्रालय

केंद्र सरकारने कर्ज विषयक विशेष खिडकी द्वारे कर्ज घेत जीएसटी भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह 16 राज्यांना 6 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले

Posted On: 23 OCT 2020 9:11PM by PIB Mumbai

 

वर्ष 2020-2021 दरम्यान जीएसटी संकलनातील तूटीची समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज विषयक विशेष खिडकी सुरू केली आहे. जीएसटी भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात 16 राज्यांना 6 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. 21 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी हा विशेष खिडकी पर्याय स्वीकारला आहे. यापैकी 5 राज्यांना जी एस टी भरपाईमधील बाकी शिल्लक नव्हती.

केंद्र सरकारने कर्ज विषयक विशेष खिडकी द्वारे जीएसटी भरपाईपोटी कर्ज घेत पहिल्या टप्प्यात 16 राज्यांना 6 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले. यामध्ये महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली आणि जम्मू आणि काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.

कर्जाचा व्याजदर 5.19 टक्के इतका आहे. राज्यांना दर आठवड्याला सहा हजार कोटी रुपये वितरित करण्याचा मानस आहे. कर्जाची कालमर्यादा पाच वर्ष असेल.

***

M.Chopade/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667169) Visitor Counter : 281