श्रम आणि रोजगार मंत्रालय

औद्योगिक कामगारांसाठी 2016=100 या नव्या मालिकेवर आधारित ग्राहक किंमत निर्देशांकांचे (CPI-IW) संतोष गंगवार यांच्या हस्ते प्रकाशन


नव्या आधारित मालिकेवरील सीपीआय-आयडब्ल्यू निर्देशांक इच्छित लोकसंख्येच्या आहारपद्धतीनुसार तो कामगारांसाठी हितकारक सिध्द होईल- गंगवार

Posted On: 22 OCT 2020 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2020


केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते आज औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाच्या 2016 या आधारभूत वर्षानुसार नव्या मालिकेचे प्रकाशन झाले. श्रम विभागाने हा नवा निर्देशांक तयार केला आहे. आधीच्या  2001=100 या , म्हणजे आधारभूत वर्ष 2001 असलेल्या निर्देशाकांच्या जागी हा नवा 2016=100 निर्देशांक असेल. या कार्यक्रमाला श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सर्व वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

याआधीही चार वेळा हा निर्देशांकात सुधारणा करत, नव्या मालीकेनुसार तो तयार करण्यात आला होता.

यावेळी बोलताना श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, या नव्या निर्देशांकात इच्छित लोकसंख्येच्या आहारविहार विषयक पद्धतींचे सद्यस्थितीतील निरीक्षण केले जाईल, जेणेकरुन मिळणारी आकडेवारी अधिकाधिक वास्तव आणि अद्ययावत असेल. यातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थूल आर्थिक निर्देशाकांचे मोजमाप करण्यास मदत होईल,असे गंगवार म्हणाले. यात करण्यात आलेल्या सुधारणा, आंतरराष्ट्रीय मानके आणि प्रमाणकांनुसार आहेत, ज्यामुळे याचे आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून तुलनात्मक विश्लेषण करणे सोपे  जाईल, असे गंगवार यांनी सांगितले.

श्रम विभागाने ज्या धीरोदात्तपणे आणि चिकाटीने हे काम करत, नवी निर्देशांक मालिका तयार करण्यात यश मिळवले, त्याचे गंगवार यांनी कौतुक केले. सर्व विभागाच्या प्रयत्नांना दाद देत, गंगवार म्हणाले, की सरकारला कोणतेही धोरण ठरवायचे असल्यास ही आकडेवारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते, त्यामुळे अशाच किचकट पण महत्वाच्या कामांच्या वेळी, श्रम विभागासारख्या संस्थांचे महत्व खऱ्या अर्थाने अधोरेखित होते.

येत्या काळात या आकडेवारीचे महत्व अधिकच वाढणार आहे, त्यासोबतच भारतात मोठ्या प्रमाणावर श्रम शक्ती असल्यामुळे श्रम विभागासारख्या, श्रम आणि किंमत विषयक सांख्यिकीला समर्पित असलेल्या संस्थेला अधिकच बळकट करण्याची गरज आहे.

श्रम विभाग प्रत्येकच आघाडीवर अत्यंत चमकदार कामगिरी करत आहे, असे गंगवार म्हणाले. 1920 साली स्थापन झालेल्या या संस्थेकडे, उत्तम दर्जाची श्रमसांख्यिकी तयार करण्याचा समृद्ध वारसा आहे. या संस्थेच्या अस्तित्वाला एक शतक पूर्ण झाल्यानंतर तिला स्वतःचा लोगो मिळाला, कार्यालयासाठी नवी ईमारत मिळाली आणि आता या विभागाने CPI(IW) निर्देशाकांची नवी मालिका तयार केली, असं गंगवार यांनी सांगितलं.

यावेळी गंगावर यांनी 2016 हे आधारभूत वर्ष धरुन सप्टेंबर 2020 या महिन्यासाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्याच निर्देशांकाचेही प्रकाशन केले. देशातील 88 केंद्रे आणि एकूणच सर्व देशभरासाठी हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याचा अखिल भारतीय निर्देशांक 118 च्या पातळीवर असून नव्या मालिकेचे जुन्या 2001=100 या आधारभूत मालिकेत रुपांतर करण्यासाठी जोडणारा दुवा 2.88 हा आहे.

2001 च्या जुन्या मालिकेच्या तुलनेत,नव्या CPI-IW (2016=100)  मालिकेत करण्यात आलेल्या काही सुधारणांची गंगवार यांनी माहिती दिली.

  1. नव्या मालिकेत, देशातली 88 केंद्रे समाविष्ट करण्यात आली आहेत, 2001 च्या मालिकेत 78 केंद्रे होती .
  2. कामगार/कष्टकरी वर्गातील उत्पन्न आणि खर्च याविषयीच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी नमुना म्हणून निवडल्या जाणाऱ्या कुटुंबांची संख्या 48384 कुटुंबांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 2001 मध्ये ती 41040 इतकी होती
  3. किरकोळ किंमतविषयक आकडेवारी संकलित करण्यासाठी आता 317 मार्केट्स वापरले जातील 2001 मध्ये ही संख्या 289  एवढी होती.  
  4. इंडेक्स बास्केट मध्ये मोजल्या जाणाऱ्या वस्तूंची संख्या देखील 463 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधी ही संख्या 392 इतकी होती.
  5. नव्या 201 6 च्या मालिकेत, राज्यांची संख्या 28 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 2001 मध्ये ती 25 इतकी होती.

  

  

 

* * *

B.Gokhale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666824) Visitor Counter : 583